मित्रांनी एकत्र खरा खाणे पडले महागात तपासणी नंतर सहाही मित्र कोरोना पाझेटिव्ह
चंद्रपूर : राजुरा तालुक्यातील वेकोलीच्या धोपटाला वसाहतीतील एका चबुतरयावर सायंकाळी गप्पागोष्टी करीत खऱ्याचे सेवन करणाऱ्या सहा मित्राना कोरोनाची लागण झाली आहे.त्यामुळे कोरोना काळात काळजी न घेणाऱ्या सर्व मित्रांच्या हे चांगलेच अंगलट आले आहे.
वेकोलीच्या सास्ती धोपटाला या कोळसा खाण कामगारांच्या वसाहतीजवळ आयटक व बीएआमचे कामगार संघटनेचे कार्यालय आहे. या समोरच रस्त्याच्या बाजूला एक सिमेंटचा चबुतरा आहे.खाणीतील काम संपल्यानंतर सायंकाळी या चबुतऱ्यावर गपागोष्टी करीत टाइमपास करणे या वसाहतीतील कामगार मित्रांचा उन्हाळा हिवाळा आणि पावसाळ्यातही यात खंड पडला नाही या चर्चेच्या वेळी काहीना खरा व तंबाखू खाण्याची आवड होती. नुकताच यापैकी एकाला ताप आला आणि त्याने कोरोना तपासणी केली असता त्याला कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले.यानंतर सर्व मित्रांनी कोरोना तपासणी केली असता सर्व मित्र कोरोना पाझेटिव्ह निघाले. त्यापैकी एकाला बेड न मिडाल्याने त्याला अमरावतीला पाठविण्यात आले व त्यांना मिळून खरा खाणे महागात पडले.