उपचारा विनाच इसमाचा मृत्यूने ब्रह्मपुरी हळहळली
ब्रह्मपुरी तालुका हा पालकमंत्री तसेच मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचा मतदारसंघ आहे.
ब्रह्मपुरी – शहरातील ख्रिस्तानंद दवाखान्यालगत असलेल्या प्रवाशी निवार्यात उपचारविनाच एका कोरोना बाधित इसमाचा तडफडून मृत्यू झाला.
मृतक गोविंदा बळीराम निकेश्वर वय (५०) हा इसम कूही तालुक्यातील आंबोरा येथील असून तेथील डॉक्टरांनी त्याला ब्रह्मपुरी येथे रेफर करायला केले. सदर इसमाची पत्नी खाजगी वाहनाने ब्रह्मपुरी येथे आणली, मात्र ब्रह्मपुरी येथील दवाखान्यात उपचारासाठी बेड उपलब्ध नाही, ऑक्सीजन नाही म्हणून त्याच्यावर उपचार होऊ शकले नाही. इतरत्र धावपळ करूनही उपचार होऊ शकले नाही. हताश झालेली मृतकाची पत्नी ब्रह्मपुरी ख्रिस्तानंद चौकातील प्रवाशी निवारा येते पतीला घेऊन होती. अशातच सकाळी साडेसात आठ च्या दरम्यान त्या इसमाचा उपचारा विना मृत्यू झाला. प्रशासनाला माहिती मिळताच क्षणाचा विलंब न लावता घटनास्थळी पोहोचले लगेच सर्व यंत्रणेला पाचारण करून मृतकाचे अंत्यविधी करण्यात आले.
ब्रह्मपुरी तालुका हा पालकमंत्री तसेच मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचा मतदारसंघ आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर कोरोना बाधित निघत असतानाही स्थानिक नगर प्रशासन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडून कोणतीही सुधारणा होताना दिसत नसल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष विजय सिद्धावार यांनी केले आहे. मागील एका आठवड्यात 529 कोरोना बाधित निघाल्याने तालुक्यात चिंतेचे वातावरण आहे. मात्र या क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणारे मंत्री विजय वडेट्टीवार याकडे लक्ष न देता मुंबईच्या लोकल बद्दलच टीव्हीवर चर्चा करताना दिसत असल्याचा आरोप विजय सिद्धावार यांनी केले आहे.