गडचिरोली जिल्ह्यात 11 मृत्यूसह आज 641नवीन कोरोना बाधित तर 424 कोरोनामुक्त
गडचिरोली,(जिमाका)दि.25 : आज जिल्हयात 641 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 424 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 18645 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 13799 वर पोहचली. तसेच सद्या 4524 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 322 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज 11 नवीन मृत्यूमध्ये ता.आरमोरी जि. गडचिरोली येथील 50 वर्षीय पुरुष, चामोर्शी रोड, गडचिरोली येथील 41 वर्षीय पुरुष, ता. मुल जि. चंद्रपूर येथील 65 वर्षीय महिला, ता. कुरखेडा जि. गडचिरोली येथील 80 वर्षीय पुरुष, ता. आरमोरी जि. गडचिरोली येथील 49 वर्षीय पुरुष, ता. आरमोरी जि. गडचिरोली येथील 65 वर्षीय महिला, ता. वडसा जि. गडचिरोली येथील 65 वर्षीय महिला, ता. वडसा जि. गडचिरोली येथील 40 वर्षीय महिला, ता. आरमोरी जि. गडचिरोली येथील 65 वर्षीय पुरुष, ता. लाखांदुर जि.भंडारा येथील 72 वर्षीय पुरुष, ता. एटापल्ली जि. गडचिरोली येथील 51 वर्षीय पुरुष यांचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 74.01 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 24.26 टक्के तर मृत्यू दर 1.73 टक्के झाला.
नवीन 641 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 226, अहेरी तालुक्यातील 67, आरमोरी 45, भामरागड तालुक्यातील 18, चामोर्शी तालुक्यातील 61, धानोरा तालुक्यातील 5, एटापल्ली तालुक्यातील 28, कोरची तालुक्यातील 38, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 22, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 10, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 27 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 97 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 424 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 170, अहेरी 68, आरमोरी 33, भामरागड 14, चामोर्शी 20, धानोरा 21 , एटापल्ली 17, मुलचेरा 4, सिरोंचा 9, कोरची 12, कुरखेडा 15, तसेच वडसा येथील 41 जणांचा समावेश आहे.