कोविड लस देण्यासाठी फिरते पथक आवश्यक – सौ रूपालीताई पंदिलवार जिल्हा परिषद सदस्य गडचिरोली
चामोर्शी:- तालुक्यातील मारकंडा कनसोबा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड लसीकरणाला सुरुवात झाली आहे .या चालू टप्प्यांमध्ये 45 वर्षाच्या पुढील नागरिकांना व कर्मचारी यांना ही लस देण्यात येत आहे.
लस घेऊन इतरांनीही लस घ्यावे असे आव्हान केले आहे.
याबाबत आरोग्य कर्मचारी, आशा कार्यकर्ती अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी हे आसटि परिसरातील गावागावातील नागरिकांनी ही लस घ्यावी असे आवाहन करीत आहेत. यामध्ये गावागावातील आशा कार्यकर्ती, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच आरोग्य खात्यातील सर्व कर्मचारी यांच्या माध्यमातून हे काम केले जात आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरुवातीला दिल्या जाणाऱ्या लसीकरण पेक्षा सध्या जनजागृती केल्यामुळे लसीकरणाच्या संख्येत निश्चितच बदल झाला आहे परंतु मारकंडा कंसोबा येथील आरोग्य केंद्रात येणारे काही गावाचे अंतर दहा किलोमीटरचे असल्याने पंचेचाळीस वर्षे वरील नागरिकांना या आरोग्य केंद्रात येण्या करीता सध्या लाकडावून चालू असल्याने वाहनांची समस्या निर्माण झाली आहे करीता आष्टी इल्लू जिल्हा परिषद क्षेत्रातील गावात कोरोना लस देण्यासाठी आरोग्य फिरते पथक सुरू करणे आवश्यक आहे करीता शासनाने याकडे लक्ष देऊन आरोग्य विभागामार्फत प्रत्येक गावात फिरते पथक सूरू करण्यात यावे अशी मागणी आष्टी – ईलूर जिल्हा परिषद शेत्राचे जिल्हा परिषद सदस्य रूपालीताई पंदीलवार यांच्याकडून करण्यात येत आहे
यावेळी घरी रहा सुरक्षित रहा विनाकारण घराबाहेर पडू नका आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा नेहमी मास्कचा वापर करा असा संदेश देण्यात आला