खासदार अशोक नेते यांनी घेतला एटापल्ली तालुक्यातील कोविड स्थितीचा आढावा
ऑक्सिजन व व्हेंटिलेटर पुरविण्याचे आश्वासन
आलापल्ली :- दि. 28 /4
गडचिरोली जिल्ह्यात कोविड बाधीत रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्याचप्रमाणे एटापल्ली तालुक्यातही कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य उपाययोजना करणे आवश्यक असून बाधीत रुग्णांना योग्य औषधोपचार करून कोरोना वर मात करण्याचे निर्देश खासदार अशोक नेते यांनी दिले. आलापल्ली शासकीय विश्रामगृहात एटापल्ली तालुक्याच्या कोविड स्थितीचा अधिकाऱ्यांकडून आढावा घेताना ते बोलत होते.
आढावा बैठकिला भाजपचे ज्येष्ठ नेते तथा ओबीसी मोर्चा चे पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख बाबुरावजी कोहळे, प्रदेश सदस्य स्वप्नील वरघंटे, जिल्हा सचिव विनोद आकनपल्लीवार, अहेरी तालुका महामंत्री पोशालु चूधरी, महिला आघाडीच्या रहिमा सिद्धीकी, तहसीलदार, वैद्यकीय अधीक्षक, नायब तहसीलदार व अधिकारी उपस्थित होते.
यावेळी खासदार अशोक नेते यांनी आढावा घेतला असता ऑक्सिजन व व्हेंटिलेटरची तसेच औषधी ची कमतरता असल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले. यावेळी खासदार अशोक नेते यांनी औषधी साठी वरिष्ठांना सूचना देणार असून केंद्रीय मंत्री मा श्री नितीनजी गडकरी यांच्याकडून ऑक्सिजन कन्सटेटर मशीन व मिनी व्हेंटिलेटर एटापल्ली तालुक्यासाठी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले व कोरोना बाधीत व कारंटाईन रुग्णांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश यावेळी खासदार अशोक नेते यांनी दिले. बैठकीला अधिकारी, विभाग प्रमुख उपस्थित होते.