गाव तेथे क्वारंटटाईम सेंटर दया जिल्हा परिषद सदस्य: -सौ रूपालीताई पंदिलवार

148

गाव तेथे क्वारंटटाईम सेंटर दया
जिल्हा परिषद सदस्य: -सौ रूपालीताई पंदिलवार

गडचिरोली:-  जिल्ह्यातील कोरोणा रूग्णाची वाढती संख्या लक्षात घेऊन
कोराेना रुग्णांवर प्रथम अवस्थेत उपचार करणे गरजेचे आहे. लक्षणॆ दिसताच जागेवरच चाचणी करून औषध उपचार केल्यास प्रथम अवस्थेत रुग्ण लवकर बरा होतो. हे आता सर्वानाच समजले आहे. गावातील प्रतिष्ठीत लोकांनी, तरुण, सामाजिक कार्यकर्ते यांनी मनावर घेतल्यास हे सहज शक्य आहे. रुग्णाच्या देखभालीसाठी गावातील, अंगणवाडी सेविका मदतनीस, आशा वर्कर, नर्स, मलेरिया वर्कर तसेच गावात एक जबाबदार शासकीय डाॅक्टर यांची नेमणूक करून त्या डाॅक्टरांनी आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा गावात भेट देऊन रुग्णाची परिस्थिती कशी आहे, याबाबत मार्गदर्शन करून औषधोपचार करावा तसेच देखरेख ठेवण्यासाठी व अडीअडचणी सोडवण्यासाठी गावातील ग्रामसेवक, तलाठी, ग्रामपंचायत शिपाई, कोतवाल, यांना शासकीय आदेश दिले तर काम फार सोपे होईल असे केल्याने खेड्यातील परिस्थितीत लवकर सुधारणा होऊ शकते, असे जिल्हा परिषद सदस्य सौ रूपालीताई पंदिलवार यांनी म्हटले आहे.