गडचिरोली जिल्ह्यात आज 603 कोरोनामुक्त तर 12 मृत्यूसह 561 नवीन कोरोना बाधित
गडचिरोली,(जिमाका)दि.29 : – आज जिल्हयात 561 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 603 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 20658 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 15650 वर पोहचली. तसेच सद्या 4624 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 384 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज 12 नवीन मृत्यूमध्ये 55 वर्षीय पुरुष आंबेशिवनी गडचिरोली, 58 वर्षीय पुरुष वडसा, 46 वर्षीय महिला गडचिरोली, 48 वर्षीय पुरुष जामगिरी ता. चामोर्शी, 75 वर्षीय महिला वडसा, 62 वर्षीय महिला लाखांदूर जि. भंडारा, 54 वर्षीय पुरुष सोनापूर, गडचिरोली, 75 वर्षीय पुरुष वैरागड, ता. आरमोरी, 65 वर्षीय पुरुष कडोली , ता. कुरखेडा, 38 वर्षीय पुरुष बोडधा, ता. वडसा, 53 वर्षीय पुरुष इंजेवारी , ता. आरमोरी, 63 वर्षीय पुरुष सिंदेवाही, जि. चंद्रपूर ,यांचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 75.56 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 22.38 टक्के तर मृत्यू दर 1.86 टक्के झाला.
नवीन 561 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 136, अहेरी तालुक्यातील 56, आरमोरी 10, भामरागड तालुक्यातील 14, चामोर्शी तालुक्यातील 73, धानोरा तालुक्यातील 17, एटापल्ली तालुक्यातील 18, कोरची तालुक्यातील 10, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 62, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 24, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 28 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 53 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 603 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 179, अहेरी 45, आरमोरी 38, भामरागड 30, चामोर्शी 63, धानोरा 27 , एटापल्ली 50, मुलचेरा 42, सिरोंचा 06, कोरची 30, कुरखेडा 34, तसेच वडसा येथील 59 जणांचा समावेश आहे.
***