आष्टी येथे 50 बेड्सचे कोव्हिडं केंद्र उभारा-व 10 ऑक्सिजन बेडची व्यवस्था करा.

160

आष्टी येथे 50 बेड्सचे कोव्हिडं केंद्र उभारा-व 10 ऑक्सिजन बेडची व्यवस्था करा.

शिवसेना उपजिल्हाप्रमुख राकेश बेलसरे

गडचिरोली
चामोर्शी तालुक्यातील आष्टी परिसरात कोरोनाबधितांच्या संख्येत दिवसागणिक होणारी वाढ बघता येथे कोव्हिडं केंद्राची नितांत आवश्यकता असून येथे तातडीने 50 बेड्सचे कोविड केंद्र व उघडण्यात यावे व 10 ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी आष्टी येथील माजी सरपंच व शिवसेना उपजिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांनी पालकमंत्र्याकडे केली आहे.

आष्टी परिसरात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आष्टी येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.येथील कोरोनाबधित रुग्णांना चामोर्शी व गडचिरोली येथील कोव्हिडं केंद्रात पाठविले जाते.अशातच चामोर्शी येथे असलेल्या कोव्हिडं केंद्रात होणारी वाढती गर्दी व अपुऱ्या बेड अभावी नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.आष्टी व आष्टी परिसर येथील लोकसंख्या विचारात घेऊन येथे 50 बेड्स चे कोव्हिडं केंद्र उभारल्यास नागरिकांना वेळेत व त्वरित उपचार होण्यास मदत होईल व आरोग्ययंत्रणेवरचा भार हलका होईल.त्वरित याकडे आरोग्य यंत्रणेचे लक्ष वेधून व रुग्णांना दिलासा देण्यात यावा अशी मागणीही त्यांनी केली.