गडचिरोली जिल्ह्यात 20 मृत्यूसह आज 506 नवीन कोरोना बाधित तर 483 कोरोनामुक्त
गडचिरोली,(जिमाका)दि.02 :- आज जिल्हयात 506 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 483 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 22257 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 17105 वर पोहचली. तसेच सद्या 4715 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 437 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज 20 नवीन मृत्यूमध्ये 70 वर्षीय पुरुष कुरखेडा, 38 वर्षीय पुरुष जारावडी ता.एटापल्ली , 60 वर्षीय पुरुष लगाम ता. मुलचेरा , 77 वर्षीय महिला आरमोरी, 50 वर्षीय ब्रम्हपूरी जि.चंद्रपूर , 49 वर्षीय महिला कुरखेडा, 64 वर्षीय पुरुष गोविंदपूर गडचिरोली, 55 वर्षीय पुरुष डोंगरगाव ता.शिंदेवाही जि. चंद्रपूर , 43 वर्षीय पुरुष कोढाळा ता. वडसा, 55 वर्षीय पुरुष वडसा, 60 वर्षीय गडचिरोली, 48 वर्षीय पुरुष सीआरपीएफ धानोरा, 52 वर्षीय पुरुष चिरचाळी ता.कुरखेडा, 73 वर्षीय नागपूर, 60 वर्षीय पुरुष रामकुष्णपुर ता.चामोर्शी , 45 वर्षीय पुरुष शंकरपूरी ता.वडसा, 65 वर्षीय महिला नागपूर, 55 वर्षीय पुरुष ता.ब्रम्हपूरी जि.चंद्रपूर, 60 वर्षीय पुरुष ता.नागभीड जि.चंद्रपूर, 69 वर्षीय पुरुष ता.सावली जि.चंद्रपूर यांचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 76.85टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 21.18 टक्के तर मृत्यू दर 1.96टक्के झाला.
नवीन 506 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 197, अहेरी तालुक्यातील 32, आरमोरी 35, भामरागड तालुक्यातील 21, चामोर्शी तालुक्यातील 46, धानोरा तालुक्यातील 19, एटापल्ली तालुक्यातील 12, कोरची तालुक्यातील 12, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 30, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 14, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 45 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 43 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 483 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 153, अहेरी 25, आरमोरी 52, भामरागड 0, चामोर्शी 57, धानोरा 34, एटापल्ली 21, मुलचेरा 25, सिरोंचा 9, कोरची 29, कुरखेडा 39, तसेच वडसा येथील 39 जणांचा समावेश आहे.