भंडाऱ्यात अवैध REMDISIVER इंजेक्शन विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश,
स्थानिक गुन्हा शाखा भंडारा
यांची कारवाई
आरोपींना अटक
भंडारा-गत वर्षा पेक्षा चालु काळात कोरोणा विविषाणुने भारतात मृत्युचेः अक्षरः तांडव मांडले असुन, मृतांच्या टाळुवरचे लोणी खाणाऱ्या या लोकांची संख्या देखील दिवसागणीक वाढतच चालली आहे. भारतीय संस्कुतीची अवहेलना करणारे काही क्रुर कर्मे अशातच रेमडीरीवर इंजेक्षन चा काळा बाजार करुन सर्वसामान्य जनतेच्या भावनेशी व जिवीताषी खेळत असल्याचे चित्र पोलीस अधीक्षक वसंत जाधव व अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या निदर्षनास आले.
यावरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण यांना स्पष्ट आदेषीत केले की, अशा उलट्या काळजाच्या लोकांची विल्हेवाट लावावी. अशा वरुन पोलीस निरीक्षव जयवंत चव्हाण यांनी गोपनीय बातमीदारांना कार्यान्वीत करुन सलग दोन आठवडे सापळा रचुन पाठपुरावा करीत राहीले. अशातच दिनांक ३०/०४/२०२१ रोजी स्थानिक गुन्हे शाखेला रेमडीसीवीर इंजेक्शन ची विक्री करणारी टोळी आज सक्रीय झाल्याची माहिती मिळाली. क्षणभर विलंब न करता हजर असलेल्या स्टॉफ ला सापळा रचुन यश मिळविण्याचा व्युह रचुन मुस्लीम लायब्ररी ते पोस्ट ऑफीस चैेकाकडे रवाना केले. तात्काळ एका व्यक्तीस रु. १,२०,०००/- रु. एवढी रक्कम देवुन ४ रेमडीसीवीर इंजेक्षन चा सौदा करण्यास सांगीतले. फोन वरुन सौदा पक्का झाल्यावर आरोपी बबन बुधे यांनी नियोजीत ठिकाणी ४ रेमडीसीवीर इंजेक्षन देण्याचे सांगीतले. काही वेळाने मुस्लीम लायब्ररी ते पोस्ट ऑफीस चौक दरम्यान सौदा झालेले इंजेशन घेण्यास गेले असता मोठ्या शिताफिने पोलीसांनी ४ रेमडीसीवीर इंजेक्शन सोबत ,बबन मन्साराम बुधे वय ३५ वर्षे रा. म्हाडा कॉलोनी, भंडारा , सचिन अशोक हुमने वय २९ वर्ष रा. म्हाडा कॉलोनी, भंडारा यास ताब्यात घेवुन अधीक चौकशी केली असता, त्यांनी ती इंजेक्शन नर्स दोन महिला यांचेकडून घेतल्याची कबुली दिली. दोन्ही महिलांची घराची झडती घेतली असता त्यांच्या घरुन मोठ्या प्रमाणात औषधींचा साठा हस्तगत करण्यात आला. तसेच आरोपी महिला यानी जादा दराने विकलेल्या औषाधांचे नगदी ९०,००० रु. एक मोटार सायकल व तिन एंड्रॉईड मोबाईल असा एकुण १,७०,९६२ रु. चा माल जप्त करण्यात आले. या बाबत दोन्ही आरोपी मुलीना विचारना केली असता , अनीकेत रंभाड ढवळे वय २१ वर्ष रा. भंडारा याच्या मदतीने रेमडीसीवीर इंजेक्षन चा गोरखधंदा चालवत असल्याचे सांगीतल. पोलीस स्टेशन भंडारा येथे अप. क्र. १४५/२०२१ कलम १८८,४२०,३४ भादंवी, परीषीष्ट औषध नियंत्रण किंमत आदेश २०१३, सहकलम, सहकलम ३(२) (क),७ जिवनावष्यक वस्तु अधिनियम १९५५, सहकलम १८(क),२७ (ख) (२) सौदर्य प्रसाधन कायदा १९९९ नुसार पाचही आरोपी विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपासात मोठे मासे अडकण्याची शक्यता आहे.
सदरची कार्यवाही जिल्हा पोलीस अधिक्षक वसंत जाधव, अपर पोलीस अधिक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे -शाखा भंडाराचे पो.
नि. जयवंत चव्हाण, पो. उपनि. विवेक राऊत, सफौ. वामन ठाकरे, पोहवा. सुधिर मडामे, पोहवा. तुळशिदास मोहरकर, पोहवा. विजय राऊत, गेंदलाल खैरे, नितीन शिवनकर, पोना. क्रिष्णा बोरकर, नंदकिशोर मारबते,अमोल खराबे, पोशी. पंकज भित्रे, बबीता चैरे, उमेश्वरी नाहोकर आदीनी स्थानिक गुन्हे शाखा,
भंडारा यांनी अन्न व औषध विभागाचे अधिकारी रामटेके यांच्यासह उत्तमरित्या पार पाडली.