वृत्तवाणी पोर्टलच्या बातमीची दखल घेऊन
जिल्हा परिषद सदस्य सौ. रूपालीताई पंदिलवार यांनी
मारकंडा कंसोबा येथे गावात गामपंचायत मार्फत केली जंतूनाशक फवारणी
चामोर्शी :- तालुक्यातील मारकंडा कनसोबा येथे गेल्या पंधरा वीस दिवसापासून संसर्गजन्य तापाची सात आहे सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग वाढला आहे त्यात अशा प्रकारची साथ गावात असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे मारकंडा कंसोबा परिसरात तापाची साथ असल्याने काही नागरिक उपचारासाठी रुग्णालयात जात आहे पण कोरोणा चाचणी होईल आणि आपल्याला कोरोना पेशंट मध्ये गणले जाईल या भीतीने अनेक नागरिक रूग्णालयात जाणे टाळत आहेत तर काही लोकांची आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने ते खाजगी रुग्णालयात जाऊ शकत नाही व या आठवड्यात ताप येऊन दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला करिता गामपंचायत प्रशासनाने ह्या समस्येची दखल घ्यावी अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे गावात जंतूनाशक फवारणी करण्यात यावी व यावर उपाययोजना करावी अशी मागणी वृत्तवाणी
माध्यमातून बातमी देण्यात आली होती या बातमीची दखल घेऊन जिल्हा परिषद सदस्या सौ रूपालीताई पंदिलवार यांनी ताबडतोब ग्रामसेवकासी संपर्क करून गावात फवारणी करण्यात आली या केलेल्या कार्याबद्दल जिल्हा परिषद सदस्यसौ रूपालीताई पंदिलवारयांचे कौतुक केले जात आहे