1330 जण पॉझेटिव्ह, 950 कोरोनामुक्त
जिल्ह्याबाहेरील चार मृत्युसह 23 मृत्यु
यवतमाळ, दि. 7 :- जिल्ह्यात गत 24 तासात 7349 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर 1330 पॉझेटिव्ह आणि 950 जण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तसेच जिल्ह्याबाहेरील चार मृत्युसह शुक्रवारी एकूण 23 झाले. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 11, खाजगी कोव्हीड रुग्णालयात नऊ आणि डीसीएचसीमधील तीन मृत्युंचा समावेश आहे.
जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार शुक्रवारी एकूण 8679 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 1330 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 7349 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 7294 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 2674 तर गृह विलगीकरणात 4620 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 60964 झाली आहे. 24 तासात 950 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 52232 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1438 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 13.15 , मृत्युदर 2.36 आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यु झालेल्यांमध्ये यवतमाळ येथील 59 वर्षीय पुरुष व 48 वर्षीय महिला, नेर तालुक्यातील 70 वर्षीय पुरुष, आर्णि तालुक्यातील 70 वर्षीय महिला, वणी तालुक्यातील 38 वर्षीय पुरुष, बाभुळगाव तालुक्यातील 70 वर्षीय पुरुष व 61 वर्षीय महिला, घाटंजी तालुक्यातील 50 व 58 वर्षीय महिला, नागपूर येथील 50 वर्षीय पुरुष आणि चंद्रपूर येथील 35 वर्षीय महिला आहे. जिल्ह्यातील डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये मृत झालेल्यांमध्ये झरीजामणी तालुक्यातील 70 वर्षीय महिला, पांढरकवडा तालुक्यातील 65 वर्षीय महिला आणि दारव्हा तालुक्यातील 70 वर्षीय पुरुष आहे. तर खाजगी रुग्णालयांत मृत्यु झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील 58, 42, 61 वर्षीय पुरुष व 75 वर्षीय महिला, मारेगाव येथील 70 वर्षीय महिला, पुसद येथील 65 वर्षीय पुरुष, महागाव येथील 50 वर्षीय पुरुष, आंध्रप्रदेश येथील 53 वर्षीय महिला आणि वर्धा येथील 40 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
शुक्रवारी पॉझेटिव्ह आलेल्या 1330 जणांमध्ये 828 पुरुष आणि 502 महिला आहेत. यात पुसद येथील 214 पॉझेटिव्ह रुग्ण, वणी 198, दिग्रस 145, यवतमाळ 120, मारेगाव 112, दारव्हा 110, बाभुळगाव 78, नेर 76, उमरखेड 62, पांढरकवडा 52, आर्णि 44, राळेगाव 26, महागाव 25, घाटंजी 20, कळंब 16, झरीजामणी 12 आणि इतर शहरातील 20 रुग्ण आहे.
सुरवातीपासून आतापर्यंत 463623 नमुने पाठविले असून यापैकी 461007 प्राप्त तर 2616 अप्राप्त आहेत. तसेच 400043 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.