चक्रीवादळ व गारपिटीने रब्बी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान

72

आरमोरी :- आरमोरी तालुक्यात आलेल्या चक्रीवादळ व गारपिटीने शेतकऱ्यांचे नुकसान झालेले असून ,पाथर गोटा, वघाळा, पळसगाव ,अरसोडा, शिवनी, सायगाव, शंकरपुर ,जोगी साखरा, रामपूर या ठिकाणी 1 मे रोजी साडे नऊ वाजताच्या सुमारास चक्रीवादळ व गारपिटीच्या धडाक्याने रब्बी पिकाचे नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांनी माजी आमदार आनंदराव गेडाम व काँग्रेस सचिव दिलीप घोडाम यांची भेट घेऊन शेतीचे सर्वेक्षण करण्याचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे केली होती. याची दखल घेऊन आरमोरी येथील तहसीलदार श्रीमान दाहाड साहेब यांनी कृषी विभाग व तलाठ्यांना सर्वेक्षणाचे आदेश दिले.
दिनांक 4 मेे 2021 पासून नुसकान ग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे सर्वेक्षण सुरू केले. यावेळी परिसरातील शेतकरी मोतीलाल लिंगायत, नारायण सरकार, जगन पत्रे व इतर शेतकरी उपस्थित होते..