माजी जिल्हाप्रमुख विजय शृंगारपवार,उपजिल्हाप्रमुख राजु कावळे, नंदू कुमरे गजानन नैताम
यांची उपचार व व्यवस्थेबाबत डॉ.रुढे यांच्या सोबत चर्चा
गडचिरोली:- दिनांक 08/05/2021ला जिल्हा शिवसेनेच्या वतीने सामान्य रूग्णालयात कोविड केअर सेंटरला सदिच्छा भेट देण्यात आली. या भेटीदरम्यान कोविड पेशंट आणि आरोग्य सेवक,कर्मचारी यांच्याशी चर्चा करून रूग्णांना जेवन पुरवठादार यांना वेळेवर जेवना देण्या संदर्भात निर्देश देण्यात आले. या नंतर सीएस डॉ रुडे़ साहेब आणि आरोग्य पथक यांच्याशी सामान्य रुग्णालयात उपचार आणि व्यवस्थे संदर्भात सविस्तर माहिती घेऊन सयुक्तिक चर्चा करण्यात आली. काही पेशंटच्या नातेवाईकांची तक्रारी असल्याने त्यांच्या तक्रारी संदर्भात सुध्दा सविस्तर चर्चा करून सर्व बाबींवर तोडगा काढण्याच्या सुचना करण्यात आले.या चर्चेदरम्यान माजी जिल्हा प्रमुख विजय श्रुंगारपवार, उपजिल्हा प्र.राजुभाऊ कावळे, विधानसभा संघटक नंदुभाऊ कुमरे, ता.प्र.गजानन नैताम डॉक्टर सोयाम साहेब डॉ धुर्वे साहेब उपस्थित होते.