सिरोंचा राष्ट्रवादी महिला कांग्रेसच्या वतीने महागाईच्या विरोधात केंद्र सरकारचा निषेध

87

तालुका महिला अध्यक्ष सौ.मनीषा रवी चल्लावार यांचे नेतृत्व

कोरोनाने_वाचलो_अन_महागाई_ने_मेलो

सिरोंचा :-देशभरात कोरोनाचे अस्मानी संकट असतानाच केंद्र सरकारच्या वतीने महागाईचे सुल्तानी संकट जनतेवर लादण्यात आले आहे. पंतप्रधान मोदींनी सत्तेत येताना जनतेला महागाईपासून मुक्तीचं ,अच्छे दिन च स्वप्न दाखवलं. देशातल्या जनतेने त्यांच्या आश्वासनांवर विश्वास ठेवून त्यांच्या हातात देश सोपवला. मात्र पेट्रोल-डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, खाद्यतेल अशा सगळ्याच वस्तूंचे दर वाढवून केंद्र सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे. जीवनावश्यक वस्तूंचे दर इतके वाढले आहेत की जनतेला जगण्यापेक्षा मरण स्वस्त वाटू लागलं आहे. यामुळेच अकार्यक्षम केंद्र सरकारचा, वाढत्या महागाईचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे.
आज सिरोंचा शहरात व ग्रामीण भागातही महिला पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गॅस सिलिंडरचे व टू व्हिलर गाडीचे श्राद्ध घालत निषेध नोंदविला.