चामोर्शी शहरात न,प, चा, दलीत वस्ती सुधार योजना निधीचा दुरुपयोग!!
आठवडी बाजारातील लहान मुलांचे खेळ पार्क व येथील नवीन होत असलेला रस्ता बांधकाम तत्काळ बंद करण्यात यावे!
भाजपा युवा मोर्चा चे वतीने मागणी , आमदार डॉ होळी यांना निवेदन!
चामोर्शी – दिनांक 13 मे 2021
येथील नगर पंचायत येथे नागरिकांना भोंगळ कारभार दिवसेंदिवस वाढतच चालला आहे
व शहरात विकास कामांच्या नावावर बोगस काम करण्याचा सपाटा सुरू आहे
व येथील आठवडी बाजार येथे आधीच शॉपिंग कॉम्प्लेक्स ,पाण्याची टाकी, हनुमान मंदिर ,व शुद्ध पाणी वितरण केंद्र , सभागृह आहेत तालुक्याचा आठवडी बाजार म्हणून दर आठवडी बाजारात संपूर्ण गडचिरोली जिल्हा व चंद्रपूर येथील व्यापारी व्यवसाय
करण्यासाठी येतात व खूप मोठा आठवडी बाजार भरतो आधीच आठवडी बाजारात जागा कमी आहे ,येथे आठवडी बाजारात आलेले व्यावसायिक मेन मार्केट लाईन येथील दुकाना समोर
बसतात, त्यातच नुकताच येथे लहान मुलांना खेळण्यासाठी झुले व खुले व्यायाम साहित्य
लावण्यात आले व येथे आठवडी बाजारात पुन्हा दलीत वस्ती सुधार योजना अंतर्गत रस्ता बांधकाम निधीचा दुरुपयोग करून येथे विनाकारण सिमेंट रोड तयार करण्यात येत आहे , ज्या कामाची काही गरज नाही
सदर रस्ता निधी स्थानिक दलीत वस्ती सुधार योजना अंतर्गत असल्याने सदर रस्ता दलीत वस्ती येथे होणे गरजेचे होते परंतु फक्त ठेकेदार यांना मलींदा देण्यासाठी आणि खिसा गरम करण्यासाठी आहे ,ज्या अर्थी नगर पंचायत येथील समस्त
प्रभागात व अनेक लेआऊट येथे ओपन स्पेस आहे त्याठिकाणी सदर झुले व व्यायाम साहित्य
हलवण्यात यावे तसेच आठवडी बाजारात सध्या सुरू असलेला रस्ता बांधकाम
कोणत्याही कामाचा नाही सदर रस्ता बांधकाम दलीत वस्ती सुधार निधी योजना अंतर्गत आहे , चामोर्शी येथे दलीत वस्तीत अनेक रस्ते प्रलंबित आहेत सदर रस्ता करण्यात आला नाही व दलीत वस्त्यांवर अन्याय करण्यात आला आहे त्यामुळे सदर रस्ता बांधकाम बंद
करण्यात यावे अशी मागणी गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ देवराव होळी यांना आ, जनसंपर्क कार्यालय चामोर्शी येथे भाजप युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रतीक राठी यांनी,भाजप तालुका अध्यक्ष दिलीप चलाख व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत निवेदन सादर करून मागणी केले