जिल्ह्यातील मान्सून परिस्थितीचा पालकमंत्री शिंदे यांच्याकडून आढावा
गडचिरोली :- जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने जिल्ह्यातील मान्सून परिस्थितीचा आढावा देखील यावेळी घेण्यात आला. जिल्ह्यातील नागरिकांना 3 महिन्यांचा रेशन पुरवठा करणे, सर्पदंश आणि विंचूदंश यावरील औषधांचा सर्व तालुक्यातील आरोग्य केंद्रात करून ठेवणे. जिल्ह्यातील गरोदर महिलांना सुरक्षित ठिकाणी आणून ठेवणे अशी सर्व मान्सूनपूर्व कामे वेळीच पूर्ण करावीत. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करावा लागणारा औषधांचा पुरवठा येत्या 15 दिवसात करून ठेवावा आशा सूचना पालकमंत्री श्री. शिंदे यांनी या बैठकीत जिल्ह्या प्रशासनाला केल्या.