आष्टी परिसरात विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त.

228

आष्टी परिसरात विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त.

आष्टी-
आष्टी परिसरात विजेच्या सततच्या लपंडावाने नागरिक त्रस्त झाले असून यासाठी महावितरणचे अकार्यक्षम अधिकारी व कर्मचारी कारणीभूत आहे.

आष्टी परिसरातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे.गेल्या तीन दिवसांपासून तर आष्टी परीसरातील आष्टी, अनखोडा,मार्कन्डा, चनदखेडी खर्डी, इल्लूर ठाकरी या गावातील बंद असलेल्या वीजपुरवठ्या मुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे .चनदखेडी खर्डी येथील वीज तीन दिवसापासून नाही तरीही महावितरणचे कर्मचारी अजूनही या गावाकडे ढुंकूनही पाहिले नाही. वारंवार होणाऱ्या विजेच्या लपंडावामुळे नागरिकांमध्ये खूप मोठा असंतोष पसरला आहे.

महावितरणचे अभियंता यांना विजेच्या समस्यांविषयी ववारंवार विचारणा केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देतात.ते सतत गैरहजर राहत असल्याचा तक्रारी आहेत.

याकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष देऊन आष्टी परिसरातील वारंवार होणाऱ्या विजेच्या लपंडावाची समस्या सोडवावी अन्यथा महावितरणविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आष्टी परिसरातील नागरिकांनी दिला आहे.