पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिह चंदेल यांचा हजारोंच्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश

146

माजी शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिह चंदेल यांचा हजारोंच्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश

गडचिरोली:- पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेच्या जिल्हा मेळाव्यात झाला पक्षप्रवेश
गडचिरोली: शिवसेना जिल्हा गडचिरोलीचे वतीने मा.नामदार एकनाथ शिंदे पालकमंत्री तथा नगरविकासमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना जिल्हा मेळावा पार पडला.या मेळाव्यात माजी जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिह चंदेल आणि त्यांचे पदाधिकारी व हजारोंच्या कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने पक्षप्रवेश झाला.त्यामुळे जिल्ह्यात शिवसेना खुप बळकट होऊन शिवसेनेला जुने वैभव प्राप्त होईल अशी जिल्ह्यात जोरदार चर्चा आहे.जिल्ह्यात माजी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिह चंदेल यांचा फार मोठा चाहतावर्ग आहे सर्वांच्या मदतीला धावून जाऊन जनतेच्या नेहमी सोबतीला असणारा व न्याय हक्कासाठी झटणारा कार्यकर्ता म्हणून ओळख आहे.त्यामुळे त्यांच्या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेच्या तळागाळातीळ कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.
शिवसेनेमध्ये प्रवेश करणार्यामध्ये माजी जिल्हापरिषद बांधकाम सभापती छायाताई कुंभारे,माजी उपजिल्हाप्रमुख अविनाश गेडाम,माजी शहर प्रमुख संतोष मारगोणवार,माजी युवाजिल्हा प्रमुख चंदू बेहरे,कुरखेडाचे माजी नगराध्यक्ष महेंद्र मोहबन्सी,माजी सभापती शेखर मने,आरमोरीचे न.प.बांधकाम सभापती सागर मने,माजी तालुकाप्रमुख आशिष काळे,सहित जवळपास पाच हजार कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
शिवसेना बळकट होईल-ना.शिंदे सुरेंद्रसिह चंदेल व कार्यकर्ते हे जुने शिवसेनेचेच होते काही कारणामुळे ते बाहेर गेले होते ते आता स्वगृही परत आल्यामुळे पक्ष बळकट होईल मी त्यांना व सर्व कार्यकर्ते याना मनापासून शुभेच्छा देतो.तसेच मुख्यंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा दुरध्वनी वरून शुभेच्छा दिल्याचे पालकमंत्री म्हणाले.
मेळाव्यात जिल्हाप्रमुख राजगोपाल सुलवावार, माजी जिल्हाप्रमुख विजय शृंगारपवार ,संपर्क प्रमुख किशोर पोतदार,उपजिल्हाप्रमुख अरविंद कात्रटवार,जिल्हा समनव्यक सुनील पोरेड्डीवार,उपजिल्हाप्रमुख राजू कावळे, आरमोरी विधानसभा संघटक राजू अंबानी,किरणभाऊ पांडव,उपजिल्हाप्रमुख भरत जोशी,अहेरी विधानसभा प्रमुख अरुण धुर्वे,उपजिल्हाप्रमुख रियाजभाई शेख,शहर प्रमुख रामकीरीत यादव, माजी नगराध्यक्ष अश्विनी यादव,हेमलता वाघाडे, अश्विनी चौधरी,वासुदेव शेडमाके,सुवरणशिंग डांगी,संजय आखरे,सर्व तालुका प्रमुख आणि हजारो कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विधानसभा संघटक नंदू कुमरे यांनी केली