जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते
आलापली:- आदिवासी समाजाच्या सांस्कृतीक तथा परम्परागत रूढी परंपरा,चालीरीती यांचे जोपसना करण्यासाठी व आदिवासीचे कार्यक्रम घेण्यासाठी समाजाच्या समाजभवन नसल्याने अडचण होत होती
आलापली येते आदिवासी उत्सव समितीच्या जागा उपलब्ध असल्याने सदर जागेवर सांस्कृतीक समाजभवन उभारून दिल्यास समाजाचे कार्यक्रम घेण्यास सोईचे होईल व आम्हाच्या समाजाच्या सांस्कृतीक विकासालाही चालना मिळेल.
या उद्देशाने आदिवासी उत्सव समितीने जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांना ७ फेब्रुवारी ला निवेदन देवून समाज भवनाची मागणी केले होते.निवेदन स्वीकारताना शब्द दिले आहे कि,आपण नेहमीच सर्व समाजाला मदत करत आले असून आलापली येते आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात असल्याने समाज भवन आवश्यक असून मि शब्द देतो कि येत्या काही दिवसांतच समाज भवनासाठी निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले होते.
जिल्हा परिषदेच्या निधीतून पंद्रह लाख रुपए मंजूर केले असुन काल सदर समाज भवनाच्या भूमिपूजन जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
यावेळी श्री.शंकर मेश्राम सरपंच आलापल्ली,श्री.विजय कुसनाके सदस्य तथा माजी सरपंच,श्री.दिलीप गंजीवार माजी सरपंच,सौ.सुगंदा मडावी माजी सरपंच, सौ.पुष्पलता जगताप सदस्य,रमेश मडावी,व्येकटी मडावी,चन्द्रकांत बेझलवार,बंडू आत्राम,महेश सडमेक, प्रशांत गोडशेलवार आविस शहर अध्यक्ष अहेरी,सुधीर मडावी,जुलेख शेख,जुनेद शेख,रहीम भाई,सौ.नॉनुरवार आगंनवाड़ी मैडम आलापल्ली व आविस चे पदादिकारी उपस्तित होते.