नाव बुडाल्याने तीन अल्पवयीन मुलींचा दुर्दैवी अंत.

218

चामोर्शी तालुक्यातील वाघोली येथील घटना.

गडचिरोली-
चामोर्शी तालुक्यातील वाघोली येथे वैनगंगा नदीच्या पात्रात नाव बुडाल्याने तीन अल्पवयीन मुलींचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारच्या सुमारास घडली.

समृद्धी ढिवरु शेंडे वय 11 वर्ष रा वाघोली ता. चामोर्शी जि. गडचिरोली, सोनी मुखरू शेंडे वय 13 वर्ष रा. वाघोली ता. चामोर्शी जि. गडचिरोली पल्लवी रमेश भोयर वय 13 वर्षे रा. येवली ता. जि. गडचिरोली अशी अल्पवयीन मृतक मुलींची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार या तिन्ही मुली काही कामानिमित्त वाघोली येथील वैनगंगा नदीच्या पात्रातून दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी निघाल्या.यावेळी नाव पाण्यात बुडाली व तिघांचा ही दुर्दैवी अंत झाला.या घटनेची माहिती मिळताच चामोर्शी पोलीस घटनास्थळी जावून या तीनही मुलींचे मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढले.व शवविच्छेदना साठी चामोर्शी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असून पुढील तपास चामोर्शी पोलीस करीत आहे.या घटनेने वाघोली गावात शोककळा पसरली आहे.