भाजपाच्या वतीने कोरोना बाधीत रुग्णांच्या नातेवाईकांसाठी नमो भोजन व्यवस्थेची सुरुवात

96

खासदार अशोक नेते यांच्या हस्ते भोजन व्यवस्थेचे उदघाटन

खास.अशोक नेते यांच्या नेतृत्वात भाजयुमो व अल्पसंख्याक मोर्चा च्या माध्यमातून नागरिकांच्या सेवेसाठी उपक्रम
गडचिरोली:- दि. 18 मे
कोविड च्या या लॉकडाऊन काळात जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती कोविड बाधीत रुग्णांच्या नातेवाईकांना जेवणाची मोठी अडचण निर्माण झाली होती. अनेक नागरिक हॉटेल्स, नास्ता सेंटर बंद असल्याने उपाशी राहत असत याची जाणीव ठेवत सामाजिक भावनेतून भारतीय जनता पार्टी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राच्या वतीने खासदार अशोक नेते यांनी भारतीय जनता युवा मोर्चा गडचिरोली शहर व अल्पसंख्याक मोर्चा च्या माध्यमातून  रुग्णाच्या नातेवाईकांना भोजनदान करण्याचा संकल्प केला व काल दि 17 मे पासून रुग्णालय परिसरात स्टॉल उभारून नमो भोजन व्यवस्था सुरू करण्यात आली.

         खासदार अशोक नेते यांच्या हस्ते फीत कापून नमो भोजन व्यवस्थेचे उदघाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे, प्रमोदजी पिपरे, गोविंदजी सारडा, जिल्हा उपाध्यक्ष डॉ भारत खटी, नप उपाध्यक्ष अनिल कुणघाडकर,भाजयुमो चे जिल्हा महामंत्री संजय बारापात्रे, नगरसेवक तथा शहर महामंत्री केशवजी निंबोड, महामंत्री विनोद देवोजवार, भाजयुमो चे शहर अध्यक्ष सागर कुमरे, सचिव सुहास उप्पलवार, अल्पसंख्याक मोर्चा चे शहर अध्यक्ष सलीमभाई शेख, महामंत्री इमरान शेख, जिल्हा महामंत्री जावेद अली सय्यद, व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
नमो भोजन व्यवस्थेच्या माध्यमातून दररोज सकाळी 11 वाजता व सायंकाळी 7 वाजता 150 लोकांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. या भोजन व्यवस्थेचा रुग्णांच्या नातेवाईकांनी लाभ घ्यावा असे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.