शिवसेनेच्या शिष्टमंडळा ची
आदिवासी विकास महामंडळ कार्यालयावर धडक
गडचिरोली:- शेतकऱ्यांची उन्हाळी फसल निघालेली आहे शेतकरी धान खरेदी केंद्र सुरू झाल्यावर धान विकण्यास येणार आहे परंतु आदिवासी महामंडळ तर्फे १० ते१२ क्विंटल प्रति ऐकरी घेणार असल्याचे कळले परंतु एवढ्या कमी प्रमाणात धान्य खरेदी केल्यास शेतकऱ्याला मिळालेलय कमी पैशात शेतकऱ्याचे आर्थिक नियोजन होणार नाही शेतकऱ्यांना पावसाळी। फसली साठी धान बियाणे, खत खरेदी करणे विजेची बिल भरणे व इतर व्यवहार चे नियोजन होऊ शकत नाही म्हणून शिवसेना माजी महिला संघटिका छाया ताई कुंभारे विधानसभा संघटक नंदू भाऊ कुमरे यांच्या नेतृत्वात आदिवासी विकास महामंडळ कार्यालयावर धडक देण्यात आली व निवेदन व्यवस्थापाक श्री कोटलावर याना देऊन चर्चा करण्यात आली
की शेतकऱ्यां कडून प्रति हेक्टरी ३५ ते ४० क्विंटल धान खरेदी करावे तसे आदेश द्यावे तसेच जिल्ह्यात सर्वच ठिकाणचे धान खरेदि केंद्र ही त्वरीत सुरू करावे अशी मागणी धरून सुमारे एक तास चर्चा चालली येत्या एक दोन दिवसात धान खरेदी केंद्र सुरू करू तसेच हेक्टरी ३० क्विंटल धान खरेदी करू असे आश्वासन दिले परंतु हेक्टरी ३५ ते ४० क्विंटल खरेदी करावे अशी मागणी शिष्टमंडळाने केली अन्यता आंदोलन करू असा इशारा शिवसेना माजी महिला संघटिका छायाताई कुंभारे विधानसभा सभा संघटक नंदू भाऊ कुमरे अश्विनी भाडेकर यांनी दिला