जिल्हा युवक कांग्रेस कमिटी पदाधिकारी यांचा पुढाकार
चामोर्शी :-
तालुक्यातील वाघोलीती येथील वैनगंगा नदीत नाव डूबन तीन मुलींना जलसमाधी मिळाली होती त्या मृतक मुलींच्या कुटूंबियांना जिल्हा युवक कांग्रेस पदाधिकारी यांनी भेट देऊन सांत्वन करीत आर्थिक मदत दिली .२१ मे रोजी जिल्हा परिषद सदस्य कविता भगत , संजय गांधी निराधार योजना तालुकाध्यक्ष प्रमोद भगत,युवक काँगेस चे जिल्हाअध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे दलित आघाडीचे जिल्हाअध्यक्ष रजनीकांत मोटघरे ,संजुभाऊ चन्ने , तौफिक शेख ,यांनी मृतक मुलींच्या कुटुंबातील व्यक्तींना भेटून त्यांचे सांत्वन केले .सोबत तिन्ही कुटूंबाना आर्थिक मदत देण्यात आली .यावेळी वाघोली येथील उपसरपंच राहुल पोरटे, माजी सरपंच तुळशीराम सातपुते शामराव पोरटे, कालिदास पोरटे ,जितेंद्र मानकर,वैभव घोंगडे, धनराज चापले, व गावकरी उपस्थित होते,
जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांचे नेतृत्वाखाली कोरोना रुग्णाच्या नातेवाहिकाना एक महिन्यापासून मोफत जेवण जिल्हा सामान्य रुग्णालय चालू आहे .वाघोलीतील घटनेची माहिती
प्रमोद भगत यांनी देताच महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी वाघोली गावाला भट देऊन आस्थेने घडलेल्या प्रकरणाची माहिती जाऊन घेऊन त्यांचे कुटुंबियांचे सांत्वन करीत आर्थिक मदत दिली .
यावेळी जिल्हा परिषद सदस्य कविता भगत यांनी शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्याचे कुटूंबियांना आश्वासन दिले .तर संजय गांधी निराधार योजना तालुका अध्यक्ष प्रमोद भगत यांनी बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांचेशी चर्चा करून सदर घटनेची माहिती दिली यानंतर ना .विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देणार असल्याचे सांगितले .