जिल्हयात 360 ग्रामपंचायतींपैकी प्रत्यक्ष 320 ग्रामपंचायतींच्या 2276 जागांसाठी 2 टप्यात होणार मतदान

146

जिल्हयात 360 ग्रामपंचायतींपैकी प्रत्यक्ष 320 ग्रामपंचायतींच्या 2276 जागांसाठी 2 टप्यात होणार मतदान

▪️20 पूर्णत: बिनविरोध,
▪️18 वैध नामनिर्देशन पत्र अप्राप्त किंवा कमी नामांकनामूळे बिनविरोध तर
▪️2 एकही नामांकन प्राप्त नसलेल्या ग्रामपंचायती

गडचिरोली (दि.13 जाने.) – जिल्हयात दि.15 व 20 जानेवारी रोजी होणाऱ्या 360 ग्रामपंचायतीमधील निवडणूकांमध्ये नामनिर्देशन पत्र अंतिम करण्यात आले आहेत. यामध्ये प्रत्यक्ष मतदान होणाऱ्या 320 ग्रामपंचायतींमध्ये 3098 जागांपैकी 146 ठिकाणी एकही वैध नामनिर्देशन पत्र प्राप्त न झाल्यामूळे रिक्त राहणार आहेत. नामनिर्देशन मागे घेण्याचा कालावधी संपल्यानंतर एका जागेसाठी एकच नामनिर्देशन बाकी असलेल्या 676 जागांवर बिनविरोध सदस्य निवडले जाणार आहेत. तर उर्वरीत 2276 जागांसाठी जिल्हयात 320 ग्रामपंचायतींमध्ये प्रत्यक्ष मतदान प्रकिया राबविली जाणार आहे.

धानोरा तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींमध्ये एकही नामनिर्देशन पत्र दाखल न झाल्याने त्या ठिकाणी मतदान होणार नाही. तसेच 20 पुर्णत: बिनविरोध होणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये गडचिरोली व कोरची तालुक्यात प्रत्येकी 4, सिरोंचा 3, आरमोरी, धानोरा व चामोर्शी प्रत्येकी 2, कुरखेडा, अहेरी व एटापल्ली प्रत्येकी 1 यांचा समावेश आहे. ग्रामपंचायतींच्या एकूण जागांपैकी काही जागांसाठी वैध नामनिर्देशन पत्र अप्राप्त असल्यामूळे व उर्वरीत जागा बिनविरोध झाल्यामुळे प्रत्यक्ष मतदान होणार नाही अशा ग्रामपंचायतींचीं संख्या 18 आहे. यामध्ये कुरखेडा 3, धानोरा 10, चामोर्शी 2, मुलचेरा 2, एटापल्ली 1 यांचा समावेश आहे.