ठाकरी येथील विलगीकरण केंद्रास शिवसेना उपजिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांनी केले फळ व मास्कचे वाटप

73

आष्टी :- आज शिवसेना उपजिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांनी भगवंतराव हायस्कूल ठाकरी येथील विलगिकरण केंद्रास भेट देवून कोरोनाबधित रुग्णांना फळे, बिस्किटे व मास्क वितरीत केले.

विलगीकरण केंद्रातील कोरोनाबधित रुग्णांना कोणत्याही समस्या आल्यास त्वरित संपर्क करण्याचे आवाहन यावेळी केले.तसेच कोरोना विषयी कोणतेही गैरसमज न बाळगता लक्षणे दिसल्यास किंवा कोरोनाबधित रुग्णांच्या संपर्कात आल्यास त्वरित चाचणी करावे की उपचारास सुरवात करावी की जेणेकरून रुग्ण अती गंभीर होणार नाही याविषयी रुग्णांसोबत चर्चा करून धीर दिला व रुग्णांचे मनोबल वाढविले.त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यात आली.व ठाकरी ग्रामपंचायने विलगिकरण केंद्र सुरू केल्याबद्दल ठाकरी ग्रामपंचायतीचे कौतुक केले.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख व आष्टीचे माजी सरपंच राकेश बेलसरे, ठाकरीच्या सरपंच नंदाताई कुळसंगे,आष्टीचे ग्रामपंचायत सदस्य कपिल पाल, ग्रा.सदस्य संतोष बारापात्रे,भाजप नेते दिवाकर मुत्तेवार, राजू बोलकुंटवार,वासुदेव कर्डेवार,सीताराम कूळसंगे,ठाकरीचे ग्रामसेवक इंद्रावन बारसागडे उपस्थित होते.