पोयारकोठी जंगल परिसरात पोलीस नक्षल चकमकीत झालेल्या मृत्यूच्या शोध मोहिमेबाबत

193

पोयारकोठी जंगल परिसरात पोलीस नक्षल चकमकीत झालेल्या मृत्यूच्या शोध मोहिमेबाबत

गडचिरोली, दि.16:- मौजा- पोयारकोठी जंगल परिसरात , पोलीस स्टेशन कोठी तालुका-एटापल्ली जिल्हा गडचिरोली येथे दिनांक 17 मे 2020 रोजी गडचिरोली जिल्हा अंतर्गत, पोलीस पथक नक्षल शोध मोहिम राबवित असतांना पोयारकोठी, जंगल परिसरात पोलीस व नक्षल यांच्यात झालेल्या गोळीबारात दोन पोलीस मृत्यु झालेले होते.

त्याअनुषंगाने , दोन्ही मृतकाचे दंडाधिकारीय तपास व चौकशी प्रक्रिया, सदर प्रकरणात फौजदार प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 176 अन्वये दंडाधिकारीय चौकशी सुरु आहे. तरी वरिल घटनेच्या संबधात ज्यांना निवेदन करावयाचे आहे, प्रतिज्ञापत्र सादर करावयाचे आहे त्यांनी 15 दिवसांचे आंत किंवा 8 जुन 2021 पर्यंत उपविभागीय दंडाधिकारी, एटापल्ली हयाचे न्यायालयात स्वत: उपस्थित राहून कार्यालयीन वेळेत दाखल करावे. माहिती देणाऱ्या व्यक्तीबाबत त्याचे विनंतीवरुन गोपनियता बाळगण्यात येईल असे मनुज जिंदल सहाय्यक जिल्हाधिकारी तथा , उप विभागीय अधिकारी , एटापल्ली यांनी कळविले आहे.