गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या गणेशपूर येथील घटना

102

गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या
गणेशपूर येथील घटना

कर्ज असल्याने आत्महत्या
मेंडकी:- मेंडकी वरून अवघ्या 3 की.मी.  अंतरावर असलेल्या, गणेशपुर येथिल, अनिल श्यामराव गुरनुले, वय ५५, या शेतकऱ्याने, दि १२ जानेवारीच्या, मध्य रात्रीच्या सुमारास, स्वतःच्याच शेतात, कडुनिंबाच्या झाडाला, गळफास लाऊन, आत्महत्या केल्याची घटना, दिनांक १३ जानेवारीला, सकाळी १० च्या सुमारास उघडकीस आली .
मृतक अनिलचे शेत, गणेशपुर पातळी रोडलगत आहे. अनिल सकाळ्च्या प्रहरी, घरी नसल्याचे आढळुण आल्याने, घरातील, व गावातील व्यक्तीनि, मृतक आनिलचा, गावात व गावाबाहेर शोध घेतला असता, सकाळी, १० वाजताच्या सुमारास, मृतकाच्या चुलतभावला, आपल्या शेतावर जात असताणा, मृतक आनिलने, झाडाला गळफास लावून, आत्महत्या केल्याच, दिसून आल.त्याने लगेच, याची माहिती गावात दिली.मृतक आनिलवर, बँकेचे, तसेच खाजगी कर्ज आहे. मागील काही दिवसापासून, अनिल खुपच आर्थीक विवंचणेत, असल्याचे साग्न्यात येत आहे. मृतकाच्या प्रश्चात, पत्नी , मुलगा, मुलगी, आहेत. पुढील तपास, मेंडकी पोलीस करीत आहेत.