तेंदूपत्ता संकलन जिवावर बेतले
ब्रह्मपुरी:-
ब्रम्हपुरी तालुक्यातील दक्षिण वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या चिचखेडा येथील भाऊराव दाेडकु जांभुळे वय,( ४७) हा शेतमजुर तेंदूपत्ता संकलनाकरीता जंगलात गेला असता सायगाव जंगलातील कक्ष क्र.१६५ या राखीव जंगलामध्ये दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला करून जागीच ठार केल्याची आज सकाळी चिचखेडा येथे घडली.
सध्या तेंदूपत्ता संकलन सुरू असुन ग्रामीण भागातील शेतमजुर तेंदुपाने गाेळा करून राेजगार मिळवित आहेत.नेहमीप्रमाने चिचखेडा येथील भाऊराव जांभुळे हा शेतमजुर पत्नी व काही सहकारी साेबत घेऊन तेंदुपाने गाेळा करायला सायगाव जंगलात सकाळी ७.५० वा. गेला.जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने सदर इसमावर हल्ला चढविला व जागीच ठार केले.त्यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली असुन तेंदुपाने गाेळा करून आपला उदरनिर्वाह करना-या मजुर लाेकांवर याचा फार मोठा परिणाम झाला आहे. यापुढे जंगलात कसे जायचे हाही प्रश्न निर्माण झाला असून लाेकांनमध्ये वन विभाग व शासनाप्रती तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. यापूर्वी सुद्धा पद्मापुर,हलदा,बाेडधा, आवळगांव,पाेहनपार,चिचगांव, मुरपार,गाेगाव,आदी गावांत अनेक लाेकांचे वाघाच्या हल्ल्यात बळी गेले आहेत.
घटनेची माहिती मिळताच पाेलीस विभाग व वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.व प्रेत उत्तरीय तपासणीसाठी ब्रम्हपुरी येथे पाठविण्यात आले.