कसनसुर केंद्रात बालभवन निर्मिती कार्यशाळा संपन्न

103

 

कसनसुर केंद्रात बालभवन निर्मिती कार्यशाळा संपन्न

एटापल्ली:– जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कुमार आशिर्वाद साहेब यांच्या प्रेरणेतून जिल्हा परिषदेतील शाळेत फुलोरा क्षमता विकास कार्यक्रम राबविला जात आहे.श्री. कुमार आशिर्वाद साहेब (भा.प्र.से) यांची शिक्षणाविषयीची तळमळ व त्यांनी यापूर्वी नाशिक येथे प्रकल्प अधिकारी असताना आश्रमशाळेतील शैक्षणिक समस्याच्या मुळाशी जाऊन शोधलेली मूळ कारणे शोधून, क्वेस्ट या संस्थेस स्वत: भेट देऊन मुल कसे शिकते हे जाणून घेतले व त्याद्वारे फुलोरा या उपक्रमाची संकल्पना आकारास आली.सध्या हा उपक्रम गडचिरोली जिल्हयातील अनेक शाळेत राबविला जात असून या उपक्रमा अंतर्गत प्रत्येक शाळेत बालभवन तयार करणे सुरू आहे.
या बालभवनाच्या प्रभावी अमलबाजवणी साठी शि.वि.अ.श्री.माकोडे सर यांच्या मार्गदर्शनात बालभवन निर्मिती कार्यशाळेचे आयोजन आश्रामशाळा कसनसुर येथे 13 जानेवारी रोजी करण्यात आले.कार्यशाळा प्रसंगी श्री.म्हशाखेत्री सर , केंद्रप्रमुख कसनसुर श्री .भाजीपाले सर , केंद्रप्रमुख कोटमी यांनी कार्यशाळेचे यशस्वी आयोजन केले.या प्रसंगी श्री.अतुल कुनघाडकर यांनी कार्यशाळेचे प्रास्ताविक व महत्व सांगितले.बालभवनात मुलांना प्रत्यक्ष अध्ययन अनुभव दिले जातात. या प्रत्यक्ष अध्ययन अनुभवातुन मुले कसे स्वत शिकतात.यांची विस्तृत माहिती सांगितली.तसेच कु.लांबाडे मॕडम , सेमस्कर मॕडम , नैताम मॕडम , प्रधान सर या सुलभकांनी साहीत्य निर्मिती साठी शिक्षकांना मार्गदर्शन केले.
कार्यशाळे दरम्यान दिनदर्शिका,हवामान तक्ता,हवामान आलेख,हजेरी तक्ता,अक्षर कार्ड,शब्द कार्ड,अंक कार्ड,वाराची नावे ,प्राण्याची ओळख,वस्तूची नावे,आमचे मित्र/ सखेसोबती,कृती कार्ड,तारेवरची वाचनालय,वॉटर बेल,वाक्य कार्ड,माझें पुस्तक कार्यक्रम,अपूर्णांक चार्ट,चौदाखडी चार्ट,परिवार खेळ,वजाबाकी तक्ता,शब्दशोध पाठी,स्वरचिन्ह,पिन बोर्ड,पुस्तकाचा दवाखाना,सूचना पट्या,मजकूर वाचन,अंकगोल इ.शैक्षणीक साहित्य या कार्यशाळेत तयार करण्यात आले.
या शैक्षणीक निर्मिती कार्यशाळेत कसनसुर , कोटमी , घोटसुर केंद्रातील शिक्षक सहभागि झाले होते. कार्यशाळेदरम्यान श्री.विकास चव्हाण सर , केंद्रप्रमुख दोलंदा/फुलोरा जिल्हा समन्वयक , श्री.गुंफेश बिसेन सर , फुलोरा तालुका मार्गदर्शक यांनी कार्यशाळेला भेट देऊन मार्गदर्शन केले.व कार्यशाळेप्रसंगी निर्माण केलेल्या साहीत्याबद्धल समाधान व्यक्त करुन बालभवन व फूलोरा उपक्रमाची शाळा स्तरावर प्रभावी अंमलबजावणी ची अपेक्षा व्यक्त केली.अशाप्रकारे बालभवन साहीत्य निर्मिती कार्यशाळा यशस्वीपणे पार पडली.
शब्दांकन श्री.आविनाश बारसागडे , तंत्रस्नेही शिक्षक , कमके याांनी केेली.