गडचिरोली-
राज्य सरकारने अवैध धंदे व वाढत्या गुन्ह्याचे प्रमाण बघता चंद्रपूर जिल्ह्यतील दारूबंदी नुकतीच उठवली.त्याच धर्तीवर गडचिरोली जिल्ह्याची दारूबंदी हटवून येथील वनांमध्ये मोठ्या प्रमाणावर असलेल्या मोहफुला वर आधारित मद्य कारखाना उभारा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रवीण चन्नावार यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
1993 पासून गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी आहे.तेव्हापासून या जिल्ह्यात अवैध दारूचा महापूर आहे.इतकेच नाही तर छत्तीसगड व तेलंगाणा च्या सीमा गडचिरोली जिल्ह्याला लागून असल्याने या राज्यातून मोठ्या प्रमाणात दारू अवैध मार्गाने गडचिरोली जिल्ह्यात येते.याचा फटका शासनाच्या महसुलाला बसत आहे.तसेच गडचिरोली जिल्ह्यात अवैध दारूविक्रेत्यांची संख्या वाढली असून या व्यवसायात लहान मुले व स्त्रिया यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे.त्यामुळे या सामाजिक दुष्परिणांमाची समस्या जिल्ह्यत निर्माण झाली आहे. जिल्ह्यत दारूबंदी असली तरी दारू पिणाऱ्यांची संख्या मात्र कमी झाली नाही.जिल्हाच्या ठिकाणी गल्लीबोळात दारू मिळते.साध गडचिरोली शहरातील अवैध दारूविक्रेत्यांवर प्रशासला चाप बसविता आला नाही.अशा परिस्थितीत जिल्ह्यतील इतर ठिकाणची परिस्थिती काय असेल याचा अंदाज येतो. आज बसल्या ठिकाणी एका मेसेजवर दारू घरपोच मिळते.तसेच जिल्ह्यत विषारी दारू मोठ्या प्रमाणात विकली जाते.याचा वाईट परिणाम आरोग्यावर होत असून जर गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी उठविली तर अवैध विषारी दारू विक्री बंद होणार.व अवैध दारूविक्रीला आळा बसणार.या बाबींचा गंभीर विचार करून गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी उठवावी.तसेच येथे मोहफुलावर आधारित मद्य कारखाना उभारावा.गडचिरोली जिल्ह्यातील जंगलात मोहफुलाची झाडे मोठया प्रमाणात आहे.आदिवासींच्या रूढी परंपरेत दारूला महत्वाचे स्थान आहे.अनेक जण घरीच मोहाची दारू गाळतात परन्तु यापासून काढण्यात येणाऱ्या दारूला बंदी असल्यामुळे याचा येथील स्थानिक आदिवासींना मोठा फटका बसत आहे.इथे मोठ्या प्रमाणात मोहफुल गोळा केल्यानंतर तो शेजारच्या छत्तीसगड राज्यात विकला जातो. परंतु महाराष्ट्र सरकारने जर मोहफुलावर आधारित मद्य कारखाना उभारण्यास प्रोत्साहन दिल्यास वनाधारीत उद्योग जिल्ह्यत स्थापन होईल व उद्योग विहिन असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल. व यातून जिल्हा विकासास हातभार लागेल.या बाबीकडे गडचिरोली जिल्ह्यचे पालकमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी लक्ष दिल्यास गडचिरोली जिल्ह्याचा कायापालट होईल तसेच चंद्रपूर जिल्ह्यचे पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांची कर्मभूमी गडचिरोली जिल्हा असल्याने त्यांना येथील परिस्थिती चे पूर्ण आकलन आहे.त्यांनी जर मोहफुला वर आधारित मद्य व इतर अनेक उद्योगांना गडचिरोली जिल्ह्यात उभारण्यासाठी पाठपुरावा केल्यास जिल्ह्याला लागलेले मागासलेपणाचे ग्रहण सुटेल अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रवीण चन्नावार यांनी केली आहे.