सिरोंचा:- जिल्ह्यातील व अहेरी विधानसभा क्षेत्रातील धान उत्पादक शेतकऱ्यांची उन्हाळी हंगामातील धान अद्याप ही आदिवासी विविध सहकारी सोसायट्या मार्फत खरेदी करण्यात न आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व असंतोष पसरलेलं असून येत्या दोन दिवसाचे आत खरेदी केंद्रामार्फत जर शेतकऱ्यांचे उन्हाळी हंगामातील धान खरेदी न केल्यास धान उत्पादक शेतकऱ्यांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरण्याचा सज्जड इशारा आविसं नेते व जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी दिला आहे.
खरेदी केंद्रांतर्गत उन्हाळी धान खरेदी करण्याबाबत जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांनी आदिवासी विकास महामंडळाचे उपप्रादेशिक व्यवस्थापक यांच्याशी भ्रमणध्वनी वरून संवाद साधला.यावेळी जि.प.अध्यक्षांनी धान उत्पादक शेतकऱ्यांची समस्या सविस्तरपणे त्यांच्यापुढे मांडल्या.यावेळी उपप्रादेशिक व्यवस्थापकांनी येत्या दोन दिवसात खरेदी केंद्रे सुरू करून धान उत्पादक शेतकऱ्यांचे उन्हाळी हंगामातील धान खरेदी करू असे आश्वासन दिले.
जिल्ह्यातील व अहेरी विधानसभा क्षेत्रातील उन्हाळी हंगामातील धान उत्पादक शेतकऱ्यांची समस्या जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांनी उचलून धरले असून यापूर्वी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुद्धा याविषयी पाठपुरावा केले आहे.
जर येत्या दोन दिवसांत उन्हाळी हंगामातील धान उत्पादक शेतकऱ्यांची उन्हाळी धान आदिवासी विविध सहकारी सोसायट्या मार्फत धान खरेदी न केल्यास आविस नेते व माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या मार्गदर्शनात व जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेतृत्वात कोविड नियमांचे पालन करून शांतीपूर्ण आंदोलनासाठी धान उत्पादक शेतकरी व आदिवासी विद्यार्थी संघाचे कार्यकर्ते तयारीत आहे.