एटापल्ली येथे खाजगी मोबाईल नेटवर्क उपलब्ध करुन देण्यात यावे :- राघव सुलवावार युवा नेते शिवसेना एटापल्ली

222

एटापल्ली येथे खाजगी मोबाईल नेटवर्क उपलब्ध करुन देण्यात यावे :- राघव सुलवावार
युवा नेते शिवसेना एटापल्ली

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना मेल ने निवेदन पाठविण्यात आले

एटापल्ली:- कोरोना संसर्गाचा पार्श्वभूमीवर सरकारने ऑनलाइन शिक्षण पद्धती सुरू केली असली तरी एटापल्ली तालुक्यात केवळ बि.एस.एन.एल(B.S.N.L) भारतीय संचार निगम लिमिटेड ची अतिशय निकृष्ट दर्जाची सेवा असून खाजगी कंपनीचे नेटवर्क नसल्याने या ऑनलाइन शिक्षण पद्धतीत अडचण निर्माण होत आहे.
त्यामुळे विध्यार्थ्यांनसह, पालक,शेतकरी वर्ग त्रस्त झाले आहेत.
सरकारने सरसकट शिक्षण व बँकिंग तथा शेतकऱ्यांना कर्ज काढण्या करिता ऑनलाइन प्रणाली लागू केली असली तरी अनेक भागात कोणतेही दूरसंचार सुविधा नाही.
तालुक्यातील दुर्गम भागातील बि.एस.एन.एल चे नेटवर्क रामभरोसे आहे याची स्पीड ० ते १५ kb ps. चालू आहे.
त्यासाठी कोणतेही कागदपत्र अपलोड करण्यासाठी भरपूर प्रतीक्षा करावी लागते.
त्यामुळे विध्यार्थ्यांनचे शिक्षण मागे पळत आहे व शेतकरी कर्ज काढता येत नाहीये.ऑनलाइनचे प्रयोग अश्या पद्धतीने एटापल्ली तालुक्यात अपयशी ठरत आहे.त्यामुळे हायस्कूल व महाविद्यालयाचे विध्यार्थी त्यांचे पालक व शेतकरी वर्ग चिंतेत आहे.नेटवर्कच्या समस्येमुळे मुलांचे अभ्यासक्रम सुद्धा मागे पडत आहे.अनेक महिन्यापासून शाळेची सवयी सुटली आहे व पावसाचे दिवस सुरू झाले असले तरी या भागातील आदिवासींना कर्ज काढल्या शिवाय शेती साठी दुसरा पर्याय नाही त्यामुळे ऑनलाइन पद्धती असल्याने शिक्षण व शेतकरी कर्ज काढावे कसे हा प्रश्न निर्माण होत आहे.
करीता अशी निकृष्ट दर्जाचे बि.एस.एन.एल नेटवर्क ची समस्या दूर करून खाजगी नेटवर्क(Jio,Airtel,Vodaphone)या नेटवर्क ची व्यवस्था करून द्यावी ही विनंती असे पाठविलेल्या मेल मध्ये उल्लेख केले आहे.