गडचिरोली. 4 जून:- कोरोना महामारीच्या काळात नागरिकांना आरोग्य सुविधा तत्परतेने उपलब्ध व्हाव्यात व रुग्णांना वेळेत इतर ठिकाणी हलविणे सोयीचे व्हावे, यासाठी शासनाकडून प्राथमिक आरोग्य केंद्राकरीता अद्ययावत अशा 8 रुग्णवाहिका आरोग्य विभागाला उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. सदर रुग्णवाहिकेचे लोकार्पण जिल्ह्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते पूजन व हिरवी झेंडी दाखवून जिल्हा परिषद येथील पटांगणात पार पडले.
कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद,जिल्हा परिषद उप अध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी,पशु संवर्धन सभापती रमेश बारसागडे,समाज कल्याण सभापती रंजिता कोडापे,महिला बाल कल्याण सभापती रोशनी पारधी,जिल्हा परिषद सदस्य अतुल गण्यरपवार,रविंद्र शाहा,रमाकांत ठेंगरी,नामदेव सोनटक्के,भाग्यवान टेकाम,जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली हे उपस्थित होते.
वितरित करण्यात आलेल्या रुग्णवाहिका प्राथमिक आरोग्य केंद्र आमगाव-1,प्राथमिक आरोग्य केंद्र घोट-1,प्राथमिक आरोग्य केंद्र भेंडाळ ता.चामोर्शी,प्राथमिक आरोग्य केंद्र कारवाफा 1ता धानोरा
,प्राथमिक आरोग्य केंद्र बोटेकसा-1 ता कोरची,प्राथमिक आरोग्य केंद्र लगाम-1 ता मूलचेरा,प्राथमिक आरोग्य केंद्र आलापल्ली-1 ता अहेरी,प्राथमिक आरोग्य केंद्र बुर्गी-1 ता एटापल्ली असे जिल्ह्यातील 8 आरोग्य केंद्रांना 8 रुग्णवाहिका वितरित करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमाला आरोग्य विभागाचे अधिकारी व जिल्हा परिषद कर्मचारी उपस्थित होते.