अहेरी:- दिनांक १९/०६/२०२१ रोज शनिवार ला अहेरी शिवसेना जिल्हा जनसंपर्क येथे शिवसेनाच्या वतीने ५५ वा वर्धापण दिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. या वर्धापन दिनाचे औचित्य साधून शिवसेना जिल्हाप्रमुख राजगोपाल सुल्वावार यांचे शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानन्तर अरुणभाऊ धुर्वे शिवसेना अहेरी विधानसभा प्रमुख यांचे हस्ते आदरणीय हिंदू हृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलीत करून पूजा अर्चना करण्यात आले. यांनतर शिवसेना उपजिल्हाप्रमुख यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना आमच्यासाठी केवळ संघटना किंवा पक्ष नसून शिवसेना हा वंदनीय बाळासाहेबांनी आमच्यावर केलेला संस्कार, विचार, आचार आहे. आज जो काही मान, सन्मान सामाजिक राजकीय ओळख प्रतिष्ठा मिळतेय ती केवळ आणि केवळ शिवसेनामुळेच मिळते. शिवसेना वाढीसाठी आपण आयुष्य अर्पण व खर्ची करणाऱ्या सर्व मान्यवर, जेष्ठ, निष्ठावंन्त, कडवट शिवसैनिकांना माझ्याकडून मनाचा मुजरा. असे मत रियाजभाई यांनी मांडले. त्यांनतर अरुणभाऊ धुर्वे यांनी आपल्या मनोगत व्यक्त करतांना भावुक होऊन आदरणीय बाळासाहेब ठाकरेजी यांचे पूर्ण जीवन मराठी माणसाच्या न्यायहक्कासाठी, माता भागणीच्या रक्षणासाठी, अखंड महाराष्ट्राची राखण करण्यासाठी, कडवट हिंदुत्वाची त्यागाची व बलिदानाची, शिवसैनिकांच्या निष्ठेची, सीमा आंदोलनाची त्याग भावनेची, अखंड भारतात जर कोणी महाराष्ट्राची राखण केली असेल तर फक्त आणि फक्त हिंदुहृदयसम्राट मा बाळासाहेब ठाकरेजी यांनीच केली. आज आपण सुखशांतीने, समृद्धीने जगत आहो ते यांच्याच पुण्यहीने जगत आहो. हे विसरता कामा नये. असे व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात राजगोपाल सुल्वावार हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी १९६६ साली चार अक्षराची शिवसेना स्थापन केली ती शिवसेना म्हणजे आपला परिवार असे मनोगत व्यक्त केले. त्यानन्तर शिवबंदन बांधून पक्ष प्रवेश कार्यक्रम घेण्यात आले.यावेळी जय भवानी, जय शिवाजी, बाळासाहेब ठाकरे यांचे विजय असो असे जल्लोषात नारे बाजी करण्यात आले याप्रसंगी बिरजूजी गेडाम, अहेरी विधानसभा संघटक, तुळजाताई तलांडे, महिला तालुकाप्रमुख, प्रफुल येरणे उपतालुका प्रमुख, सज्जू पाठण शहर प्रमुख, महेश मोहुर्ले शहर प्रमुख, अंकुश मंडलवार, युवासेना शहर प्रमुख, नीलकमल मंडल, मुलचेरा तालुका संघटक, सुभाष घुटे, विलास पोचमपल्लीवार, दिलीप सुरपाम, हेमंत चौहान, प्रेमीलाताई मडावी, अनिल येनगंटीवार, शुभम कुंटेवार, हिंदूताई गायकवाड, रसिका तलांडे, राघव सुल्वावार, प्रशांत येर्रावर, संगीता कन्नाके, अजय संगमवार, कमला मिर्जा, विनय धुर्वे हे शिवसैनिक व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.