स्पोर्ट चेस गेम मध्ये प्रथम क्रमांक मिळविलेल्या बद्दल युवा संकल्प संस्था शाखा कुनघाडा व चामोशी तर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
गडचिरोली:- ऑल इंडिया चेस फेडरेशन मार्फत राष्ट्रीयस्तरावर ‘ चेस इन स्कुल ‘ या विशेष परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते . या परीक्षेचा 3 जून रोजी निकाल जाहीर झाला असून कुनघाडा येथील भाग्यश्री भांडेकर उत्तीर्ण झाली आहे . या परीक्षेसाठी विविध गटांमध्ये खेळाडूंचे वर्गीकरण करण्यात आले होते . प्रथम गटामध्ये राष्ट्रीय बुद्धिबळ खेळाडू तथा राज्य बुद्धिबळ पंच भाग्यश्री सुरेश भांडेकर हिचा समावेश करण्यात आला होता . या गटाला ग्रँडमास्टर अनुराग महामल , प्रफुल झावेरी यांनी मार्गदर्शन केले . या शिबिराचे आयोजन 10 ते 14 मार्च दरम्यान ऑनलाइनरित्या करण्यात आले होते . यात देशातून जवळपास तीन हजारांपेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता . या परीक्षेत गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रीय बुद्धिबळ खेळाडू भाग्यश्री भांडेकर हिने घवघवीत यश संपादित करून महाराष्ट्राच्या वैभवशाली परंपरेतबुद्धिबळ या खेळाचे नाव देशभर उंचावले आहे . या परीक्षेत देशातून फक्त साधारणतः 17 टक्के परीक्षार्थी उत्तीर्ण झाले . भाग्यश्री सुरेश भांडेकर ही कुनघाडा (रै )येथील शेतकऱ्याची मुलगी असून सध्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी तयारी करीत आहे . या यशाबद्दल तिचे कौतुक होत आहे . त्या करीता युवा संकल्प ग्रुप चामोर्शी व कुनघाडा (रै)च्या वतीने भाग्यश्री भांडेकर हिचे पुष्पगुच्छ तसेच बुद्धिबळ देऊन स्वागत करण्यात आले.त्यावेळी उपस्थित विद्यार्थिनींचे आई-वडील सुरेश भांडेकर व लिलाबाई भांडेकर, संतोष भांडेकर,वैशनी भाडेकर,.युवा संकल्प ग्रुप चामोशी प्रमुख सुरज नैताम, कुनघाडा प्रमुख श्रीकृष्ण वैरागडे, चामोशी उपप्रमुख प्रशांत चुदरी सदस्य राहुल चिचघरे,अजय भांडेकर, स्वप्निल चिचघरे,रुचिक चिचघरे,नामदेव वासेकर,नितेश कोठारे,सचिन कुनघाडकर उपस्थित होते.