एटापल्ली येथे संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक

157

संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक

५० प्रकरणे मंजूर

एटापल्ली,
स्थानिक तहसील कार्यलयात ६ जुलै रोजी तहसीलदार प्रदीप शेवाळे यांच्या उपस्तीतीत संजय गांधी योजना समितीची बैठक पार पडली.यावेळी तालुक्यातील विविध योजनांचे ५० प्रकरणे मंजूर करण्यात आले आहेत.
यावेळी राष्ट्रीय कुटुंब लाभ योजने अंतर्गत १४ महिलांना धनादेश वितरण करण्यात आले तसेच संजय गांधी निराधार १५,श्रावणबाळ २२ अशा विविध योजनांचे ५० प्रकरण मंजूर करण्यात आले.
४ लाभार्थ्यांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्याने प्रकरण प्रलंबित ठेवण्यात आले आहे.तालुक्यातील लाभार्थ्यांना विशेष सहाय्य योजनेचा लाभ मिळण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कोरोनाच संसर्ग आटोक्यात असल्याने विविध योजनांचा लाभ शेवटच्या टोकापर्यंत पोहचविण्यासाठी नियोजन करण्यात आले.
बैठकीत तहसीलदार प्रदीप शेवाळे,नायब तहसीलदार जवाजीवार,संगांयो शाखेचे वेस्कळे,घुमलवार मॅडम,तालुका स्तरीय समितीचे अध्यक्ष रमेश टिकले,राघव सुलवावार,दौलत दहागावकर,लक्ष्मण नरोटे,काशीनाथ बोदलकर,संदीप वैरागडे,जितेंद्र खन्ना यांच्यासह सदस्य सहभागी झाले होते