चामोर्शी तालुक्यात प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा शुभारंभ

85

तालुका कृषि अधिकारी सागर डांगे यांनी दाखवली हिरवी झेंडी.

कुनघाडा रै:-शासनाने खरीप हंगाम २०२१-२०२२ या सत्रासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना राज्यातील‌ सर्व शेतकऱ्यांसाठी राबविण्याचा निर्णय घेतला असुन चामोर्शी तालुक्यात या योजनेच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला आहे,तालुका कृषि अधिकारी सागर डांगे यांनी हिरवी झेंडी दाखविली,चामोर्शी तालुक्यात भात व कापूस हि पिके अधिकृत मानली जातात तालुक्यातील जास्तीत जास्त कर्जदार बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे अ‌से आव्हान तालुका कृषि अधिकारी सागर डांगे यांनी केले,हि योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी एच्छीक स्वरूपाची आहे शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता हा अधिसुचित खरीप हंगामातील पिकांसाठी २ टक्के नगदी पिकांसाठी ५ टक्के असा मर्यादित ठेवण्यात‌ आला आहे या योजनेची अंतिम मुदत १५ जूलै पर्यंत असुन विहीत मुदती पूर्वी नजीकच्या बॅंकेत किंवा आपले सरकार केंद्राच्या माध्यमातून शासनाच्या संकेतस्थळावर आवश्यक कागद पत्रासह जमा करावे असे आव्हान कृषि विभागाच्या वतीने करण्यात आले आहे,प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या शुभारंभा प्रंसगी मंडळ कृषि अधिकारी कुमारी नेहा फरांदे,कृषि सहाय्यक विमा प्रतिनिधी चंद्रशेखर शेरखी,मंडळ कृषि अधिकारी गजभिये,कृषि सहाय्यक होडबे,रनमले,उमेश उडाण,चापडे,पेंदाम,यचवाड, खोब्रागडे,सोमनकर,शेतकरी विनायक पेंदाम,धनराज वासेकर व तालुक्यातील इतर शेतकरी उपस्थित होते.