भामरागड येथील पुनर्वसन संबंधी शिवसैनिकांनी पालकमंत्री यांची घेतले भेट!

80

पुनवर्सन करून देण्याचे पालकमंत्र्यांनी दिले आश्वासन

संपर्क प्रमुख किशोर पोतदार व रियाज भाई शेख यांचे पुढाकार

अहेरी:- विधानसभा क्षेत्रातील भामरागड येथील पर्लकोटा-पामुलगौतम नदीवर नव्याने मोठ्या पुलाचे निर्माणाधीन कार्य सुरू असून पुलाच्या बांधकामाच्या रस्त्यावर जुने वसलेले दुकाने व घरे जाणार असल्याने पुनर्वसनाचा मोठा यक्षप्रश्न व्यापाऱ्यांमध्ये आ वासून उभा आहे.
गत 25 जून रोजी शिवसेनेचे गडचिरोली जिल्हा संपर्क प्रमुख किशोर पोतदार, अहेरी विधानसभेचे जिल्हा प्रमुख रियाज भाई शेख व गडचिरोली विधानसभा निर्वाचन क्षेत्राचे जिल्हाप्रमुख वासूदेव शेडमाके भामरागड तालुक्याचा दौरा केले असता पुलीयाग्रस्त व्यापारी संघटनेचे पदाधिकारी व परिवारांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसमोर व्यथा व कैफियत मांडून पुनर्वसन करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन दिले.
जिल्हा प्रमुख रियाज भाई शेख व स्थानिक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गडचिरोली जिल्हा संपर्क प्रमुख किशोर पोतदार यांच्या नेतृत्वात शुक्रवार 9 जुलै रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथराव शिंदे यांची मुंबईत प्रत्यक्षात भेट घेऊन भामरागड येथील पुनर्वसनाचा प्रश्न लावून धरले व समस्या मार्गी लावण्याची मागणी करून गडचिरोली जिल्ह्यातील व प्रामुख्याने अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्रातील अन्य विविध विकासात्मक बाबींवर सकारात्मक चर्चा केले.
जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथराव शिंदे यांनी प्रामुख्याने भामरागड येथील पुलग्रस्त व्यापारी व गरीब कुटुंबीयांचे लवकरच योग्य ठिकाणी पुनर्वसन करण्यात येईल असे आश्वासन दिल्याने व पुनर्वसनासाठी हिरवा कंदील पालकमंत्र्यांनी दाखविल्याने पुलग्रस्त व्यापारी , छोटे उद्योगधंदे करणारे दुकानदार व गरीब परिवारांचे लवकरच कायमस्वरूपी प्रश्न मिटणार असल्याने शिवसैनिकांनी आनंद व्यक्त करून जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथराव शिंदे यांचे आभार मानले आहे.