अहेरी, सिरोंचा, एटापल्ली, भामरागड, मूलचेरा तालुक्यात अभियान राबविणार
शिवसेना जिल्हा प्रमुख रियाज शेख यांची माहिती
अहेरी:- मुंबई येथे गत गुरुवार 8 जुलै रोजी शिवसेना पक्ष प्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी राज्यातील सर्व शिवसेना जिल्हा प्रमुखांची महत्त्वपूर्ण बैठक घेऊन 12 ते 24 जुलै पर्यंत राज्यव्यापी शिवसंपर्क अभियान राबविण्याचे निर्देश दिले, त्या अनुषंगाने अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्रात सोमवार 12 जुलै रोजी अहेरी येथील शिवसेना जनसंपर्क कार्यालयातून ‘शिवसंपर्क अभियानाचे’ शुभारंभ करण्यात येईल अशी माहिती अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्राचे जिल्हा प्रमुख रियाज भाई शेख यांनी दिले.
रियाज भाई शेख यांनी म्हटले आहे की, सध्या कोरोनाचा काळ व कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू असून प्रत्येक गावातील नागरिकांनी लसीकरण करून कोरोनाला हद्दपार व गाव कोरोना मुक्त करण्यासाठी प्रयत्न करावे आणि यासाठी शिवसैनिकांनी गावोगावी जनजागृती व पुढाकार घेण्याचे संकल्पना करून मुख्यतः गावातील अडी-अडचणी, समस्या जाणून घेण्यासाठी आणि ते प्रश्न तात्काळ निकाली व मार्गी लावण्यासाठी पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी राज्यव्यापी शिवसंपर्क अभियान राबविण्याचे मोहीम हाती घेतले असून अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्रातून सोमवारी अभियानाचे शुभारंभ करण्यात येणार असल्याचे कळविले आहे.
अहेरीच्या शिवसेना जनसंपर्क कार्यालयात ‘शिवसंपर्क अभियान’ शुभारंभाच्या प्रसंगी सह संपर्क प्रमुख विलास कोडाप, उपजिल्हा प्रमुख अरुण धुर्वे, संघटक बिरजू गेडाम, सिरोंचा येथील तालुका प्रमुख अमित तीपटीवार, संघटक दुर्गेश तोकला,एटापल्ली तालुका प्रमुख किसन मटामी, भामरागडचे तालुका प्रमुख खुशाल मडावी, मूलचेरा येथील तालुका प्रमुख गौरव बाला, बंगाली आघाडीचे दीपक बिश्वास, निखिल मंडल, अहेरी उपतालुका प्रमुख प्रफुल्ल येरणे, अहेरी शहर प्रमुख महेश मोहूर्ले, ज्येष्ठ शिवसैनिक सुभाष घुटे, दिलीप सुरपाम, सज्जू पठाण, अहेरी तालुका महिला संघटिका तुळजाताई तलांडे, पौर्णिमा इष्टाम आदी व अन्य शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार असून 12 ते 24 जुलै दरम्यान चालणाऱ्या शिवसंपर्क अभियानात शिवसैनिकांनी सामील होऊन पक्षाचे ध्येय-धोरणे, पक्ष विस्तार व पक्ष संघटन मजबुतीसाठी व मुख्यतः कोरोना मुक्तीसाठी शिवसंपर्क अभियान यशस्वीपणे राबविण्याचे आवाहन अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्राचे जिल्हा प्रमुख रियाज भाई शेख यांनी केले आहे.