शिवसैनिकांनो गाव व वार्ड कोरोना मुक्त करण्यासाठी प्रयत्नशील कार्य करा- अहेरी विधानसभा, शिवसेना जिल्हा प्रमुख, यांचे आवाहन.

65

अहेरी विधानसभा क्षेत्रात १२ जुलै ते २४ जुलै दरम्यान शिव संपर्क अभियान राविण्यासाठी शिवसैनिक कसली कंबर.

 अहेरी:- शिवसेना पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री, उध्दव बालासाहेब ठाकरे साहेब यांनी शिव संपर्क मोहीम राबविण्याचे आदेश दिले असल्याचे अहेरी विधानसभा, शिवसेना जिल्हा प्रमुख, रियाज शेख यांनी सांगितले या मोहिमअंतर्गत,पक्षप्रमुखानी जो दिलेला आदेश सर्व शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक यशस्वी करण्यासाठी १२ जुलै ते २४ जुलै दरम्यान राबविण्यात येणार असल्याचे अहेरी विधानसभा, जिल्हा प्रमुख रियाज शेख यांनी सांगितले. शिव संपर्क मोहीम राबविण्यासाठी अहेरी विधानसभा क्षेत्रातील पाचही तालुक्यातील पदाधिकारी शिवसैनिक, अहेरी येथील शिवसेना जनसंपर्क जिल्हा कार्यालय अहेरी येथून सुरुवात करण्यात येईल असे ही अहेरी जिल्हा प्रमुख रियाज शेख यांनी कार्यक्रमाच्या माध्यमाने, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पंचायत, ग्राम पंचायत वार्ड निहाय, गाव पातळीवर नियोजित शिव संपर्क अभियानात प्रमुख मार्गदर्शक मा. विलास भाऊ कोडा पे साहेब, यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात करण्यात येईल असे ही अहेरी विधानसभा जिल्हा प्रमुख रियाज शेख यांनी सांगितले, तसेच हा कार्यक्रम राबविताना कोरोणा प्रादुर्भाव याची दक्षता घेत शासनाच्या निर्देशानुसार पालन करण्यात येईल, या शिव संपर्क मोहीम अंतर्गत लोकांची समस्या विविध समस्या जाणून शासना पर्यंत पाठपुरावा करण्यात येईल आणि मार्गी लावण्याचे प्रयत्न केला जाईल. आणि शिवसेना पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी यात अहेरी विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी शिवसैनिक कार्यकर्ता शिवसेना जनसंपर्क कार्यालय अहेरी, येथून१२ जुलै सोमवार ला सह संपर्क प्रमुख आणि अहेरी विधानसभा जिल्हा प्रमुख यांचे पाच तालुक्यातील पदाधिकारी शिवसैनिक यांच्याशी संवाद साधून अभियानाची सुरुवात होईल. उपजिल्हा प्रमुख, अरुण धुरवे सर, विधान सभा संघटक, बिरजू गेडाम, अहेरी उप तालुका प्रमुख, प्रफुल येरणे, सिरोंचां तालुका प्रमुख, अमित तिपतीवार, एटापल्ली तालुका प्रमुख, किसन मतामी, मुलचेरा तालुका प्रमुख, गौरव बाला, भामरागड तालुका प्रमुख, खुशाल मडावी, तालुका संघटक, दुर्गेश तोकला, तूर्जा तलांडी, तालुका संघटिका , अहेरी विधानसभा बंगाली आघाडी जिल्हा प्रमुख, दीपक विस्वास, अहेरी विधानसभा बंगाली आघाडी उप जिल्हा प्रमुख, नीलकमल मंडल, दिलीप सुरपाम, सुभाष गुटे, सज्जू पठाण, शहर प्रमुख, महेश मोहूर्ले, शहर प्रमुख, पौर्णिमा इष्टाम, युवा सेना पदाधिकारी, महिला आघाडी पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत.