गडचिरोली:- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. डॉ नामदेवराव उसेंडी यांच्या सूचनेनुसार महागाई, गॅस, पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या दरवाढीबाबत केंद्र सरकारचा निषेध करण्याकरिता संपूर्ण महाराष्ट्रात दिनांक ११ ते १७ जुलै २०२१ पर्यंत विविध आंदोलने आयोजित केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून १२ जुलै रोजी ”स्वाक्षरी अभियाना” चा कार्यक्रम महीला काँगेस अनु जाती विभागाच्या वतीने स्थळ शृंगारपवार पेट्रोल पंप येथे आयोजित करण्यात आलेला आहे.
तरी आपण दिनांक: १२ जुलै २०२१ रोजी वेळ: ११ वाजता स्थळ: शृंगारपवार पेट्रोल पंप धानोरा रोड गडचिरोली येथे पेट्रोल भरणाऱ्या महीला – पुरूषसहीत, सर्वसामान्य व
सर्व काँगेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून स्वाक्षरी अभियानात सहभागी व्हावे. असे आव्हान लता ढोक जिल्हाध्यक्षा, महीला अनुसूचित जाती विभाग जिल्हा काँग्रेस कमिटी गडचिरोली, अपर्णा खेवले शहारध्यक्षा, महीला अनु जाती विभाग काँग्रेस कमिटी गडचिरोली यांनी केले आहे.