जय शिवाजी, जय भवानी आणि जय महाराष्ट्राचे नारे गुंजवीत शिवसंपर्क अभियानाचे शुभारंभ

106

अहेरीत फोडले नारळ

शाही थाटात शुभारंभ!

अहेरी:- शिवसंपर्क अभियानाचे शुभारंभ अहेरी येथील शिवसेना जनसंपर्क कार्यालयात जय शिवाजी, जय भवानी आणि जय महाराष्ट्र अशी गगनभेदी नारे गुंजवीत नारळ फोडून शिवसंपर्क अभियानाचे शुभारंभ सोमवार 12 जुलै रोजी करण्यात आले.
शिवसेना पक्षाचे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख किशोर पोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख विलास कोडाप व अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्राचे जिल्हा प्रमुख रियाज भाई शेख यांनी विधिवतपणे नारळ फोडून व अभियानाच्या गाड्यांना भगवा झेंडा दाखवून शिवसंपर्क अभियान मोहिमेचे शाही थाटात शुभारंभ केले.
अहेरी येथून अहेरी, सिरोंचा, मूलचेरा, एटापल्ली, भामरागड तालुक्याच्या शिवसंपर्क अभियान गाड्यांना रवाना करण्यात आले.
या प्रसंगी जिल्हा प्रमुख रियाज भाई शेख यांनी, सध्या कोरोनाचा काळ व कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू असल्याने प्रत्येक गाव कोरोना मुक्त करण्यासाठी शिवसैनिकांनी प्रयत्न करावे असे आवाहन करून शिवसंपर्क अभियान हे पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, साहेब यांच्या संकल्पनेतील असल्याने प्रत्येक शिवसैनिकांनी या अभियानात सामील होऊन यशस्वी करण्याचे रियाज भाई शेख यांनी म्हणत ‘गाव तिथे शाखा व घर तिथे शिवसैनिक’ या संकल्पनेतून पक्षाची मजबूत संघटन बांधणी व पक्ष नोंदणी करण्याचेही यावेळी आवाहन केले.
यावेळी सहसंपर्क प्रमुख विलास कोडाप यांनी, शिवसंपर्क अभियान हे राज्यव्यापी असून जनता व गावकऱ्यांच्या समस्या, अडी-अडचणी, प्रश्न जाणून घेऊन त्याचे आराखडा पक्षश्रेष्टी व राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे पाठवून प्रश्न व समस्या निकाली लावण्याची ही सुवर्ण संधी असून शिवसैनिकांनी व नागरिकांनी अभियानाचे लाभ घ्यावे असे आवाहन केले.
प्रास्ताविकातून अहेरी उपजिल्हा प्रमुख अरुण धुर्वे यांनी शिवसंपर्क अभियानाचे पाश्र्वभूमी सांगीतले. संचालन सुभाष घुटे यांनी केले.
यावेळी माजी जिल्हाप्रमुख राजगोपाल सुलवावार, शिक्षक सेनेचे जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर बघमारे जेष्ठ शिवसैनिक रामशाही मडावी, अहेरी विधानसभा संघटक बिरजू गेडाम, सिरोंचा तालुकाप्रमुख अमित तीपट्टीवार, मूलचेरा तालुका प्रमुख गौरव बाला, ग्रामीण तालुका प्रमुख काशीनाथ कन्नाके, भामरागड तालुका प्रमुख खुशाल मडावी, अहेरी उपतालुका प्रमुख प्रफुल्ल येरणे, अहेरी शहर प्रमुख महेश मोहूर्ले, दिलीप सुरपाम, सज्जू पठाण, दुर्गेश तोकला, उज्जवल तिवारी, दीपक बिश्वास, निलकमल मंडल, संजय मंडल, इंदूताई गायकवाड, प्रेमीला मडावी, रसिका कोरेत, लक्ष्मीताई गोमासे, राजेश गुंतीवार, रुपेश नुकूम, शिवकुमार स्वामी, विलास पोचमपल्लीवार आदी व पाचही तालुक्यातील शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.