एटापल्ली : एटापल्ली वनपरिक्षेत्र अधिकारी श्री संजू दास राठोड हे मागील तीन वर्षांपासून कार्यभार सांभाळल्यापासून हे कोणाचेच रक्षक नसून स्वतःच भक्षक असून अनेक सरकारी योजना कागदोपत्री दाखवून स्वतःच भक्षण करीत आहेत.एटापल्ली फॉरेस्ट गार्डन मधील शेकडो ओषधी वनस्पती व इतर वनस्पती CRPF व व्यापारी संगटनेच्या माध्यमातून बऱ्याच वृक्षांची लागवड करण्यात आले होते.या संपूर्ण वनस्पतींची जबाबदारी वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याकडे असल्याने ते पाण्याअभावी व जनावरांनी फस्त केल्याने संपूर्ण वनस्पती नष्ट झाले.गार्डन भु-क्षेत्रातील 25 टक्के जागेवर लोकांनी अतिक्रमण केले असून बगीचा पूर्ण नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.अशा बऱ्याच सागवन वृक्षानची कत्तल झाली असून बऱ्याच ठिकाणी भ्रष्टाचाराचा कळस वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड यांनी गाठलेला आहे. त्यांच्यावर त्वरीत कार्यवाही करावी नाहीतर गावकरी व व्यापारी संगटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल व याची सर्व जबाबदारी आपल्यावर राहील असे निवेदन उपवनसंरक्षक भामरागड, वनविभाग आलापल्ली यांना दिले आहे.