सिरोंचा शहरात शिवसंपर्क अभियाना अंतर्गत बैठक

98

प्रभाग निहाय चर्चा करण्यात आले

महिला आघाडी व युवा सेनेची कार्यकारिणीही गठीत

सिरोंचा:- शिवसेना पक्षाचे राज्यव्यापी शिवसंपर्क अभियान 12 जुलै पासून प्रारंभ झाले असून शुक्रवार 16 जुलै रोजी येथील विश्राम गृहात शिवसंपर्क अभियाना अंतर्गत बैठक घेऊन प्रभाग निहाय सविस्तर चर्चा करण्यात आले.
शिवसेनेचे पक्ष प्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या सूचनेनुसार जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख किशोर पोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली व सहसंपर्क प्रमुख विलास कोडाप यांच्या सहकार्याने अहेरी विधानसभा जिल्हा प्रमुख रियाज शेख यांनी अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्रात शिवसंपर्क अभियान राबवित असून शुक्रवारी शिवसेनेचे तालुका प्रमुख अमित तिपट्टीवार, तालुका संघटक दुर्गेश तोकला यांच्या उपस्थितीत सिरोंचा शहराचा आढावा बैठक घेतले.
यावेळी जिल्हा प्रमुख रियाज शेख यांनी शहरातील प्रभाग निहाय आढावा घेऊन विकास कामांसाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व राज्याचे नगरविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.एकनाथराव शिंदे सदैव प्रयत्नशील व कटिबद्ध असून शहराच्या विकासासाठी शिवसेनेचे संघटन वाढवून पक्षाचे ध्येय-धोरणे, पक्षाचे आचार-विचार प्रत्येक घराघरात पोहचवा असे आवाहन करून रियाज शेख यांनी कोरोना मुक्तीसाठी कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करा असेही मोलाचे मार्गदर्शन यावेळी शिवसैनिकांना केले.
तसेच सिरोंचा नगरात एकूण 17 प्रभाग असून प्रभाग व बुथनिहाय प्रमुखांची नियुक्ती करून प्रामुख्याने महिला आघाडी व युवा सेनेची यावेळी कार्यकारिणी गठीत करण्यात आले असून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी ‘गाव तिथे शाखा व घर तिथे शिवसैनिक’ उपक्रम राबवून शिवसंपर्क अभियान युद्धपातळीवर राबविण्याचे सूचना करण्यात आले.
यावेळी शिवसेना उपतालुका प्रमुख चंदू बत्तुला, शहर प्रमुख तुषार येनडे, अल्पसंख्यांक तालुका प्रमुख शफीक कुरेशी, सिद्धीकी, आसिफ खान, युसुफ शेख, जान्मत पोलमपल्ली, अब्दुल इरफान शेख, मुशर्रफ खान, साई आईला, वार्ड प्रमुख श्रीनिवास कोंडागुर्ला, वेणू कोतावडला,वॉर्ड प्रमुख संतोष पेराला, राहुल बत्तुला, हेमंत लाटकरी, शाखा प्रमुख सैय्यद सलिम, किरण रिक्कूला, रमेश सापलवार, जितेंद्र मोरे आदी व अन्य प्रभाग निहाय शिवसैनिक उपस्थित होते.