आष्टी-
आष्टीजवळील रामनगट्टा येथील गजानन नैताम हे आजारांनी ग्रस्त असल्याची माहिती आष्टीचे माजी सरपंच व शिवसेना उपजिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांना कळताच त्यांनी रामनगट्टा येथे जाऊन गजानन नैताम यांची भेट घेतली.व त्यांची आस्थापूर्वक विचारपूस करून त्यांच्यावर सेवाग्राम येथे मोफत शस्त्रक्रियेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे त्वरित संबंधितांना पाठविली.व त्यांच्यावर होणाऱ्या शस्त्रक्रियेसाठी योजनेंचा लाभ मिळवून दिला. तसेच त्यांना आर्थिक मदत दिली.व रूग्णालयात गेल्यानंतर कोणतीही अडचण आल्यास त्वरित संपर्क साधण्यास सांगितले. तसेच त्याठिकाणी रुग्णाला रक्ताची आवश्यकता पडल्यास त्यांची त्वरित व्यवस्था करण्याची तजवीज केली. व गजानन नैताम व त्यांच्या कुटूंबियांना धीर दिला.
शिवसेना उपजिल्हाप्रमुख राकेश भाऊ बेलसरे मदतीला धावून आल्याबद्दल नैताम कुटूंबियांनी त्यांचे आभार मानले.
गोरगरिब,गरजूच्या मदतीसाठी, एका हाकेवर धावून जाणारे अशी ओळख असलेल्या शिवसेना उपजिल्हा प्रमुख राकेश बेलसरे यांच्यातील माणुसकीचा परिचय यावेळी दिसून आला.
यावेळी दिवाकर मुत्तेवार,गणेश डोमटवार,विनायक पेंदाम, सूरज उरेते, राजू पेंदाम, महेश पेंदाम, योगेश पेंदाम, ब्रम्हा मडावी,आदी उपस्थित होते.