एटापल्ली:- सूरजगड लोह प्रकल्प एटापल्ली येथे येथे त्रिवेणी अर्थ मुव्हर्स ने उत्कखंनं शुरु करण्याचा कामाला सुरुवात केली असून सदर प्रकल्पत पुनःरता 100% स्थानिकांना रोजगार देण्यात यावे आणि या कंपनीचा आत्ता परंताचा कामाचं स्वरूप बघता कंपनीने एटापल्ली तालुक्याचा विकासाचा दृष्टिकोन पुढे ठेऊन काम करत आहे. आणि आज पर्यंतचा इतिहासात महाराष्ट्रात गडचिरोली हा जिल्हा उद्योगहीन जिल्हा म्हणून ओळखला जातो तरी गडचिरोली जिल्यात वन, जन व खनिज संपत्ती मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून इथे यावर आधारित उद्योग व कारखाने नाही तरी इथे यावर आधारित उद्योग निर्माण केले तर हा जिल्हा सुजलाम सुफलाम होईल. आणि इथल्या लोकांची बेरोजगारी लक्षात घेता जनप्रतिनिधीचे विकासाच्या दृष्टिकोनतुन सकारात्मक विचार आहे तरीही हा प्रकल्प सुरु करण्यात यावे भविष्यात या प्रकल्पमुळे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हजारो लोकांना रोजगार मिळणार असून हा तालुका व विधानसभा व जिल्हा सुजलाम सुफलाम होईल पन कंपनिने भविष्यात स्थानिक लोकांना डावलून इतरांना रोजगार देण्याचा विचार केल्यास मात्र आमचा या प्रकल्पला तीव्र विरोध राहील म्हणून कंपनीने स्थानिकांना पहिले प्राधान्य द्यावे. असा इशारा इंजि.निखिल प्रमोद गादेवार जिल्हा उपाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा गडचिरोली यांनी दिला आहे.