चामोर्शी:- २६ जुलै हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून आपल्या देशात साजरा केला जातो.या युद्धात आपले बरेचसे विर जवान शहीद झाले. त्यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण करून त्यांना मानवंदना देण्यात आली. आजच्या आधुनिक युगात वृक्षाची लागवड व संगोपन करणे ही काळाची गरज आहे. औ्योगिकीकरणामुळे आज मोठ्या प्रमाणत वृक्षतोड करण्यात येत आहे. त्यामुळे वृक्षाची संख्या कमी होत आहे,त्याचा दूरगामी परिणाम मानवजातीवर व पर्यावरणावर होत आहे.
वृक्षारोपण केल्याने वृक्षवाढ होण्यास मदत होऊन पर्यावरण सुधारण्यास हातभार लागेल,या उद्देशाने वृक्षारोपण करण्यात आले.या वृक्षारोपण कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष राहुल वैरागडे,सहसचिव प्रशांत पालपल्लिवार,आदर्श वडेट्टीवार,प्रशांत कुसराम,वैभव रापर्तीवर,भूषण मोगरे व गावातील नागरिक उपस्थित होते.