किशोर गोविंदवार यांचा सेवानिवृत्ति निमित्त सत्कार

185

आष्टी:-राजे धर्मराव हायस्कूल अडपल्ली(माल)येथील जेष्ठ शिक्षक श्री किशोर गोविंदवार हे नियत वयोमनानुसार वयाच्या 58 व्या वर्षी सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त नुकताच शाळेच्या वतीने शाल ,श्रीफळ व साड़ी देऊन त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री एन.एस. बोरकुटे मुख्याध्यापक राजे धर्मराव हाईस्कूल अडपल्ली (माल)हे होते तर प्रमुख अतिथि म्हणून श्री कृष्णपद मंडल सेवानिवृत्त शिक्षक हे होते. श्री किशोर गोविंदवार, त्यांच्या पत्नी सौ.ज्योती गोविंदवार, मुलगा प्रतिक, मुलगी वैष्णवी व जावई श्री मयुर नुत्तलवार हे सर्व सत्कारप्रसंगी हजर होते.
श्री किशोर गोविंदवार हे खऱ्या अर्थाने आदर्श शिक्षक व अष्टपैलु व्यक्तिमत्व होते.ते विद्यार्थिप्रिय शिक्षक होते. तसेच ते इतर सर्व कर्मचारी सोबत हसतखेळत काम करायचे व कोनकडूनही हसतखेळत काम करवून घ्यायचे. जवळपास 4 महिने प्रभारी मुख्याध्यापक म्हणून राजे धर्मराव हायस्कूल भामरागड येथील कार्यभार उत्कृष्टपणे पार पाडला.
शाळेमध्ये शिकविन्याबारोबरच ते इतर कार्यामध्येही तेवढीच रुचि घेऊन काम करायचे व कोणतीही जबाबदारी दिली तरी ते चोखपने पार पाडायचे.
अगदी शेवटच्या दिवसापर्यंत त्यांनी शाळेच्या प्रत्येक कार्यात मौलिक योगदान दिले
त्याचबरोबर त्यांनी सामाजिक कार्याची आवड़ जोपासली.
त्यांचा महत्वाचा गुण म्हणजे ते कोणालाही त्यांच्या कार्यात हसतमुखाने सहकार्य करायचे. असे एक प्रामाणिक व्यक्तिमत्वाचे धनी व अष्टपैलु व्यक्तिमत्व म्हणजे श्री किशोर गोविंदवार सर. अडपल्ली शेजारिल सर्व गावात त्यांचा संपर्क दांडगा होता. त्यांच्या सत्कारप्रसंगी श्री के. पी. मंडल, श्री जाईद शेख, श्री एम. एन
सरकार श्री एस टी ब्रह्मणकर श्रीमती अस्मिता भीमनवार मँडम आदि उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन श्री आर.आर.सरकार यांनी केले तर आभार श्री एस.टी.ब्राह्मणकर यांनी मानले. तसेच शिक्षकेतर कर्मचारी श्री दिवाकर गेडाम, श्री बोकडे श्री पिटाले, श्री कुमरे, श्री लालचंद झाड़े यांनी मोलाचे सहकार्य केले.