एटापल्ली येथे श्रीराम जन्म भूमी अयोध्या येथील श्रीराम मंदिर निधी समर्पण कार्यालयाचे उदघाटन

129

एटापल्ली येथे श्रीराम जन्म भूमी अयोध्या येथील श्रीराम मंदिर निधी समर्पण कार्यालयाचे उदघाटन

एटापल्ली :- आज दिनांक 16/01/2021 रोज शनिवार एटापल्ली येथे श्रीराम जन्म भूमी अयोध्या येथील श्रीराम मंदिर निधी समर्पण कार्यालयाचे उदघाटन येथील वीर बाबुराव शेडमाके वाचनालय येथे करण्यात आले .
कार्यक्रम अध्यक्ष स्थानावर श्री साईनाथजी मारगोणवार गुरुदेव सेवा मंडळ चे प्रमुख हे होते. तर जनजाती समाजातील श्री गजाननजी आत्राम ,गायत्री परिवार सदस्य श्री गोंगुलुजी उसेंडी प्रमुख अतिथी होते. तसेच मंचावर वर्ष 1992 मधील अयोध्या येथे कारसेवक म्हणून गेलेले स्थानिक श्री श्रीनिवासजी पडमटेंटीवार हे उपस्थित होते. अभियान टोळीचे तालुका प्रमुख श्री अनिकेत मामीळवार होते .
कार्यक्रमाचे संचालन श्री प्रमोद चिंतलवार तर प्रास्ताविक श्री उमाकांतजी उपगणलावार यांनी केले . कारसेवक श्री पडमटेंटीवार यांचे समिती तर्फे शाल व श्रीफळ देऊन श्री भांडारकर यांचे हस्ते सत्कार करण्यात आले. श्री पडमटेंटीवार यांनी अयोध्या येथे घडलेली 1992 ची घटना मनोगतातून व्यक्त केले.
श्रीराममंदिर निधी संतर्पण अभियान व संपूर्ण पाश्वभूमी अभियान टोळीचे पालक श्री उमेशजी चिट्टीवार यांनी समजावून सांगितले संपूर्ण तालुका व पूर्ण गाव प्रत्येक घरातून श्रीराम मंदिर निर्माण करिता तण मन धनपूर्वक निधी समर्पण करावे असे आव्हान समितीच्या वतीने करण्यात आले.
या प्रसंगी श्री. रमेशजी भोयर ,राजू नलतीगलवार, प्रशांत तोडेवार, पुरुषोत्तम गादेवार, अमोल गजाडीवार , गोपाल सर, टायगर ग्रुप, शैलेश आकुलवार , रवी रामगुंडेवार, मणीकंठ गादेवार , सौ.मायाबाई मांढरे, सौ. भांडारकर, श्री गावडे सर, विषवजित दास सर्वांनी सहकार्य केले